World Ovarian Cancer Day 2023  Saam Tv
लाईफस्टाईल

World Ovarian Cancer Day 2023 : महिलांना गर्भाशयच्या कर्करोगाचा अधिक धोका ! कसे ओळखाल ? जाणून घ्या लक्षणे

Ovarian Cancer Day : जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ८ मे रोजी जागतिक गर्भाशयाच्या कर्करोग दिन साजरा केला जातो.

कोमल दामुद्रे

How to identify cervical cancer : जगभरातील ८० टक्के महिला या गर्भाशयाच्या कर्करोगांने ग्रस्त आहे. सतत बिघडत चालेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हा आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बरेचदा महिला आपलं काही दुखणे अंगावर काढतात. त्यामुळे त्यांना अनेक मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते.

हल्लीच्या धावपळीच्या जगात महिलांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देता येतं नाही. गर्भाशयाचा कर्करोग हा गंभीर आजारांपैकी एक आहे. हा एक प्राणघातक आजार (Disease) आहे, त्याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ८ मे रोजी जागतिक गर्भाशयाच्या कर्करोग (Cancer) दिन साजरा केला जातो.

या आजारावर वेळीच उपचार न केल्यास जीव देखील जाण्याची अधिक शक्यता असते. जाणून घेऊयात या आजाराची लक्षणे

1. गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे (Symptoms)

गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका अनेक महिलांना असतो. अशा परिस्थितीत या आजारांबद्दल जागरुक राहाणे महत्त्वाचे आहे. या आजारात सुरुवातीची लक्षणे लवकर दिसून येत नाहीत. काही वेळेस दुखणे हे सामान्य आजारासारखे असते. परंतु आपण वेळीच लक्ष दिल्यास या आजारांवर मात करता येते.

  • बद्धकोष्ठतेचा त्रास

  • अपचन होणे

  • सतत थकवा येणे

  • छातीत जळजळ होणे

  • पाठदुखी

  • सतत लघवी होणे

  • ओटीपोटात वेदना

  • वजन कमी होणे

  • पोट फुगणे किंवा सुजणे

2. कशी घ्याल काळजी ?

वरील पैकी कोणतीही लक्षणे तुम्हाला दिसल्यास तुम्ही त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. ज्यामुळे या आजारावर वेळीच मात करता येईल. तसेच खाण्यापिण्यात बदल करायला हवा. कोणतेही दुखणे अंगावर काढू नये.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priya Marathe Passes Away : मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Hair dye reaction: केसांना कलर केल्यास होऊ शकते रिएक्शन; अॅलर्जी झाल्यास दिसतात 'ही' लक्षणं, वेळीच ओळखा

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक

Kumbha Rashi : आरोग्याची समस्या, पण ध्यान-प्रार्थनेत दडलेले गुपित यश, वाचा राशीभविष्य

Smartphone Addiction : रात्री झोपण्यापूर्वी फोन वापरणं ठरतंय घातक, तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT