WINTER BATHING TIPS Ai Image
लाईफस्टाईल

Winter Skincare : हिवाळ्यात अंघोळ करणे त्रासदायक? जाणून घ्या बेस्ट बार्थ टायमिंग

Winter Daily Skincare Routine : हिवाळ्यात रोज गरम पाण्याने अंघोळ आणि साबणाचा अतिवापर केल्याने त्वचा कोरडी पडू शकते. जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स.

Alisha Khedekar

हिवाळा सुरू झाला की सकाळी अंघोळ करण्याचा कंटाळा अनेकांना येतो. थंड वातावरणात उब मिळावी यासाठी अनेक जण गरम पाण्याने अंघोळ करतात. मात्र, हिवाळ्यात रोज गरम पाण्याने अंघोळ करणं आणि साबणाचा अतिवापर करणं त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण यामुळे त्वचा कोरडी पडण्याची समस्या वाढते. अशा वेळी त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी अंघोळीच्या सवयींमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे.

हिवाळ्यात तापमान कमी असल्यामुळे त्वचा आधीच कोरडी होण्याची शक्यता असते. त्यात रोज गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचेचा ओलावा आणखी कमी होतो. त्यामुळे त्वचेवर खाज येणे, त्वचा ताणल्यासारखी वाटणे, लालसरपणा आणि काही ठिकाणी त्वचा फाटण्याची समस्या जाणवू शकते.

विशेषतः ज्यांची त्वचा आधीपासून सेन्सिटिव्ह किंवा कोरडी आहे, त्यांनी अंघोळीच्या सवयींकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. रोज अंघोळ करताना खूप गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा. जास्त वेळ पाण्याखाली राहिल्याने त्वचेतील ओलावा कमी होऊ शकतो. तसेच साबणाचा अतिवापर आणि त्वचा जोरात घासणं टाळा..

त्वचेला त्रास न देणारा सौम्य साबण किंवा बॉडी वॉश वापरणं फायदेशीर ठरू शकतं. अंघोळीनंतर त्वचेची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. टॉवेलने त्वचा जोरात घासण्याऐवजी हलक्या हाताने पुसा. त्वचा थोडी ओलसर असतानाच मॉइश्चरायझर लावा. त्यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. त्वचेवर सतत खाज, लालसरपणा किंवा भेगा पडत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today : ३ दिवसात सोनं ४००० रुपयांनी महागलं, सुवर्णबाजारात दर वाढ का झाली?

Stress And Diabetes : जास्त टेन्शन घेता? सावधान! होऊ शकतो मधुमेहाचा धोका? जाणून घ्या तज्ज्ञांकडून महत्त्वाची माहिती

पुण्यात सोशल मीडियावर मैत्री अन् महिलेची फसवणूक; दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाचं आमिष दाखवून दुचाकी, मोबाईल लंपास

Gun Master G9 Review: इम्रान हाश्मीचा 'गन मास्टर जी९' थिएटरमध्ये पास की फेल? प्रेक्षकांनी सांगितला कसा वाटला सिनेमा

Navi Mumbai : नवी मुंबईत सशस्त्र दरोडा! व्हॅनमधून २० कोटींचं सोनं लुटलं; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT