Dry Fruits Ladoo Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Dry Fruits Ladoo Recipe : हिवाळ्यात थंडीपासून वाचण्यासाठी ट्राय करा इम्युनिटी बूस्टर ड्राय फ्रुट्स लाडू, राहाल तंदुरुस्त

Winter Care Tips : हिवाळा म्हटलं की, अनेक संसर्गजन्य आजार होण्याचे अधिक प्रमाणात शक्यता असते. थंडीच्या दिवसांत आपण बऱ्याचदा बाहेरचं अनहेल्दी फूड खातो. त्यामुळे आजारी देखील पडतो.

कोमल दामुद्रे

Immunity Booster Ladoo :

हिवाळा म्हटलं की, अनेक संसर्गजन्य आजार होण्याचे अधिक प्रमाणात शक्यता असते. थंडीच्या दिवसांत आपण बऱ्याचदा बाहेरचं अनहेल्दी फूड खातो. त्यामुळे आजारी देखील पडतो. परंतु, आरोग्याची काळजी घ्यायची असेल आणि थंडीच्या दिवसात तंदुरुस्त राहायचे असेल तर ड्राय फ्रुट्सचे लाडू उपयुक्त ठरतील.

ड्राय फ्रुट्समध्ये अनेक प्रकारचे पोषकतत्व असते. ज्याचा आरोग्याला फायदा होतो. जर तुम्ही हिवाळ्यात सतत आजारी पडत असाल तर या काळात ड्राय फ्रुट्सपासून लाडू बनवू शकता. यामुळे तुम्हाला थंडीत एनर्जी मिळेल. कसे बनवाल पाहा रेसिपी. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. साहित्य

  • शेंगदाणे - १/४ कप

  • गुळ - २६० ग्रॅम

  • तीळ - १/४ कप

  • खरबूज बी - १/४ कप

  • खसखस - १/४ कप

  • बदाम - १/४ कप

  • किसलेले सुके खोबरे (Coconut) - १/२ कप

  • मखाणे - १ कप

  • सुंठ पावडर - १ चमचा

  • जायफळ पूड - १ चमचा

  • वेलची पूड - १ छोटा चमचा

2. कृती

  • सर्वप्रथम तीळ आणि खरबूजच्या बियांना चांगले भाजून त्याची पावडर तयार करा. त्यानंतर खोबऱ्याचा किस आणि खसखस भाजून घ्या.

  • मखाणे वेगळे भाजल्यानंतर बदाम आणि शेंगदाणे भाजून त्याला जाडसर पूड वाटून घ्या.

  • त्यानंतर वाटलेले सगळे ड्रायफ्रुट्स मिक्स करुन घ्या. त्यानंतर कढईमध्ये चिरलेला गुळ घेऊन पाणी घालून मंद आचेवर वितळवून घ्या.

  • त्यानंतर त्याचे एकतारी पाक तयार होईल. यामध्ये सुंठ पावडर, जायफळ पूड, वेलची पूड घाला.

  • गुळाच्या पाकात सुक्या मेव्याची तयार पावडर घालून मिक्स करा. मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर लाडू वळवायला घ्या.

  • हिवाळ्यात (Winter season) नियमितपणे या लाडूचे सेवन केल्यास शरीराला (Health) फायदा होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : धुळ्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT