Raggi Noodles Recipe  Saam Tv
लाईफस्टाईल

Raggi Noodles Recipe : मुलांसाठी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे नुडल्स, आवडीने खातील; पाहा रेसिपी

कोमल दामुद्रे

Healthy Tasty Raggi Noodles :

हिवाळा म्हटलं की, या काळात थंडी अधिक प्रमाणात जाणवते. या काळात स्नायू अधिक बळकट होण्यासाठी आपण हेल्दी फूड खाण्याकडे अधिक भर दिला जातो.

हिवाळ्यात आपले आरोग्य निरोगी राहाण्यासाठी नाचणी खाण्याचा सल्ला दिला जातो. शरीरात अधिक उष्णता टिकवून ठेवण्यासाठी नाचणी खाल्ली जाते. परंतु, नाचणी खाताना मुलं नाक मुरडतात. अशावेळी मुलांना टेस्टी पण हेल्दी फूड खाऊ घालायचे असतील तर नाचणीच्या नुडल्सची रेसिपी ट्राय करु शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाजारात नाचणीचे नुडल्स विकत मिळतात. त्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत नाही. बनवताना त्याला योग्य प्रकारे उकळवल्यास अधिक चविष्ट लागतात.

1. साहित्य

  • १ कप नाचणी नूडल्स

  • पाणी (Water)

  • १ टेबलस्पून तेल (Oil)

  • १/२ कप मिक्स भाज्या (गाजर, वाटाणे, भोपळा मिरची)

  • २ पाकळ्या किसलेला लसूण

  • १ टिस्पून किसलेले आले (Ginger)

  • १ बारीक चिरलेली हिरवी मिरची

  • १/२ कप टोफू किंवा पनीर

  • चवीनुसार मीठ

  • मिरपूड

  • गार्निशसाठी कोथिंबीर

2. कृती

  • नाचणीचे नूडल्स पाण्यात उकळवून घ्या. नंतर एका पॅनमध्ये मंद आचेवर तेल गरम करा.

  • त्यात चिरलेला लसूण, किसलेले आले आणि चिरलेली हिरवी मिरची घाला. लालसर होईपर्यंत चांगले परतवून घ्या.

  • नंतर त्यात भाज्या घालून थोडे शिजवून घ्या. त्यात पनीर किंवा टोफूचे तुकडे घालून २ ते ३ मिनिटे शिजवा.

  • वरुन चवीनुसार मीठ आणि मिरपूड घाला. त्यात उकडवलेले नाचणीचे नूडल्स घालून चांगले मिसळा.

  • कोथिंबीर घालून वाफ काढा. सर्व्ह करा गरमागरम नाचणीचे टेस्टी हेल्दी नूडल्स मुलांना खाऊ घाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT