Winter Care Tips Saam tv
लाईफस्टाईल

Winter Care Tips : हिवाळ्यात सकाळी प्या हा ज्यूस, आरोग्याला होतील जबरदस्त फायदे

कोमल दामुद्रे

Beetroot Benefits :

हिवाळा म्हटलं की, अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. या काळात आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वातावरणातील गारव्याच्या आपल्या आरोग्यावर परिणाम होतो.

या काळात आपल्याला अनेक हेल्दी फूड (Food) खाण्याचा सल्ला दिला जातो. चांगल्या त्वचेसाठी, चांगल्या आरोग्यासाठी रोज ज्यूस पिणे फायदेशीर (Benefits) ठरते. अशातच जर तुम्ही नियमितपणे बीटरुटचा ज्यूस प्यायला तर आरोग्याला अधिक फायदे होतील.

बीटरुट बहुतेकदा सॅलड म्हणून खाल्ला जातो. याचे सेवन केल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्व आणि खनिजे मिळतात. ज्यामुळे तुम्ही निरोगी राहू शकता. अशा परिस्थितीत दररोज सकाळी बीटरुटचा रस प्यायल्याने अनेक आजारांपासून (Disease) मुक्ती मिळू शकते.

बीटरुटमध्ये अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम, जस्त तांबे, जीवनसत्त्वे आणि खनिजांसह पोषक तत्वांचे भांडार आहे. बीटरुटचा रस प्यायल्याने व्यायाम सहनशक्ती आणि स्नायूंची शक्ती वाढू शकते.

1. कोलेस्टेरॉलपासून सरंक्षण

सकाळी बीटरुटचा रस प्यायल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहाते. बीटरुटचा रस कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो.

2. लठ्ठपणा कमी होतो

हिवाळ्यात बीटरुटचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास कमी होते. शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत करते. यात कॅलरीज कमी असतात आणि फॅट नसते.

3. चयापचय वाढते

चयापचय कमजोर असणाऱ्यांनी रोज बीटरुटचे सेवन करावे. कमकुवत चयापचयमुळे तुमची ऊर्जा कमी होते आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : घरात प्रिंटरच्या माध्यमातून बनावट नोटा छपाई; पोलिसांची १४ ठिकाणी छापेमारी, एकास अटक

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

SCROLL FOR NEXT