White Hair Care : पांढऱ्या केसांना मुळापासून तोडून टाकताय? टाळूसाठी ठरु शकते हानिकारक, कशी घ्याल काळजी?

Does Plucking White Hair Lead To More Greying : आपल्यापैकी अनेकांना सवय असते की, पांढऱ्या केसांना मुळापासून तोडून टाकण्याची. त्यामुळे आपल्या टाळूवर परिणाम होतो. वयोमानानुसार केस पांढरे होऊ लागतात. अगदी लहान वयात केस पांढरे होऊ लागले तर शरीराला पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्व किंवा प्रोटीन मिळत नाही.
White Hair Care
White Hair CareSaam tv
Published On

Premature White Hair Plucking

ऋतू कोणताही असो, केसगळतीची समस्या ही कायम असते. केसगळती, केस कमकुवत होणे आणि पांढऱ्या केसांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अकाली पिकणाऱ्या केसांना पुन्हा काळे करण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या गोष्टी वापरतो.

केस (Hair) अकाली पिकू लागले की, त्यांना पुन्हा काळे करण्यासाठी आपण अधिक प्रयत्न करतो. परंतु, आपल्यापैकी अनेकांना सवय असते की, पांढऱ्या केसांना मुळापासून तोडून टाकण्याची. त्यामुळे आपल्या टाळूवर परिणाम होतो.

वयोमानानुसार केस पांढरे होऊ लागतात. अगदी लहान वयात केस पांढरे होऊ लागले तर शरीराला पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्व (Vitamins) किंवा प्रोटीन मिळत नाही. त्यामुळे केस अकाली पिकतात. वयानुसार शरीरातील मेलानोसाइट्स नावाच्या पेशी कमी झाल्यामुळे केस पांढरे होतात. याची कारणे जसे की, आनुवंशिकता, खाण्यापिण्याच्या सवयी, तणाव, पोषक तत्वांचा अभाव, धुम्रपान, प्रदूषणआणि अनेक आजारांमुळे (Disease) देखील केस अकाली पांढरे होण्याची समस्या असू शकते. जर तुम्ही देखील पांढऱ्या केसांना मुळापासून तोडून टाकताय तर त्याचा परिणाम कसा होतो हे जाणून घ्या.

White Hair Care
Hair Care Tips : हिवाळ्यात केसगळतीच्या समस्येने त्रस्त, चेहऱ्यावर सतत डाग येताय? आवळ्याचा असा करा वापर

1. संसर्गाचा धोका

केस ओढल्याने मुळांमध्ये बॅक्टेरिया संसर्ग होऊ शकतो. संसर्गामुळे पुरळ आणि इतर समस्या उद्भवतात. त्यामुळे पांढरे केस मुळापासून तोडणे टाळा.

2. follicle चे नुकसान

केस बळजबरीने उपटल्यास follicleचे नुकसान होते. ज्यामुळे केसांची वाढ होत नाही. त्यामुळे वेळीच असे करणे थांबवा.

3. टाळूची जळजळ

मुळांतून केस काढून टाकल्यामुळे, टाळूमध्ये जळजळ होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पुरळ येणे, खाज येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

White Hair Care
New Year 2024 Astrology : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरात आणा या वस्तू, कधीच भासणार नाही पैशांची चणचण

4. हायपरपिग्मेंटेशन

केस वारंवार उपटल्यामुळे त्या ठिकाणी हायपरपिंग्मेंटेशन होण्याचा धोका असतो. यामुळे तुमच्या टाळूचे नुकसान होऊ शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com