Arthritis Diet  Saam tv
लाईफस्टाईल

Arthritis Diet : तुम्हालाही संधिवाताचा त्रास आहे? या पदार्थांचे सेवन करणे टाळा, अन्यथा...

Winter Care Tips : हिवाळा सुरु झाला की, अनेकांना संधिवाताचा त्रास उद्भवतो. सांधेदुखीमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. या स्थितीमध्ये हाडांमधील वेदना आणि सूज वाढू लागते. काळजी न घेतल्यास हा आजार संपूर्ण शरीरभर पसरु लागतो.

कोमल दामुद्रे

Which Foods To Avoid in Arthritis Disease :

हिवाळा सुरु झाला की, अनेकांना संधिवाताचा त्रास उद्भवतो. सांधेदुखीमध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. या स्थितीमध्ये हाडांमधील वेदना आणि सूज वाढू लागते. काळजी न घेतल्यास हा आजार संपूर्ण शरीरभर पसरु लागतो.

जर तुम्हालाही हा आजार (Disease) असेल तर तुम्ही देखील काळजी घ्यायला हवी. तसेच खाण्यापिण्याच्या गोष्टीतही बदल करायला हवे. यासाठी चुकूनही तुम्ही या ४ गोष्टींचा आहारात (Diet) समावेश करु नका.

1. वनस्पती तेल

जर तुम्ही संधिवाताच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही चुकूनही आहारात वनस्पती तेलाचा वापर करु नये. त्यात उच्च ओमेगा आणि फॅटी अॅसिड अधिक प्रमाणात असते. जे स्नायूंमधली सूज वाढवू शकते.

2. संत्री

या आजारात संत्री आणि इतर आंबट फळे खाणे टाळावे. यामध्ये व्हिटॅमिन (Vitamin) सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे तुमच्या हाडांवर जमा होणाऱ्या कॅल्शियमचा थर खराब होऊ शकतो. ज्यामुळे संधिवाताचा त्रास अधिक वाढेल.

3. वांग

वांग्यामध्ये सोलॅनिन नावाचे संयुग समृद्ध असते. जे संधिवात हाडांसाठी हानिकारक आहे. त्यामुळे हाडे आतून कमकुवत होऊ लागतात. जर याचे सेवन तुम्ही देखील करत असाल तर वेळीच थांबवा.

4. कॉफी

हल्ली कॉफी पिण्याचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढले आहे. जर तुम्ही देखील दिवसाला चार ते पाच कप कॉफी पित असाल तर वेळीच थांबा. कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असल्याने तुमच्या हाडांचे आरोग्य कमकुवत होऊ शकते. ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT