Orange Barfi Recipe  Saam tv
लाईफस्टाईल

Orange Barfi Recipe : इम्युनिटी बूस्टसाठी फायदेशीर ठरेल संत्र्याची बर्फी, हिवाळ्यात नारंगी मिठाई नक्की ट्राय करा

Santryachi Barfi : संत्र्याच्या रसाची चव आपण चाखली असेलच पण तुम्ही कधी संत्र्याची बर्फी खाल्ली आहे का? संत्रीमध्ये व्हिटॅमीन सी मुबलक प्रमाणात असते. संत्र्याची बर्फी त्वचेसाठी फायदेशीर ठरु शकते. ही नारंगी बर्फी कशी बनवायची पाहूया रेसिपी

कोमल दामुद्रे

How To Make Orange Barfi :

हिवाळा म्हटलं की, या ऋतूमध्ये अनेक फळांची चव चाखयला मिळते. अशातच नागपूरची आंबट-गोड संत्री सर्वत्र प्रसिद्ध आहे. नागपूरची संत्री हा नागपूरकरांचा अभिमान आहे.

संत्र्याच्या रसाची चव आपण चाखली असेलच पण तुम्ही कधी संत्र्याची बर्फी खाल्ली आहे का? संत्रीमध्ये व्हिटॅमीन सी मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. ज्यामुळे अनेक आजारांपासून (Disease) दूर राहाता येते. तसेच संत्र्याची बर्फी त्वचेसाठी (Skin) फायदेशीर ठरु शकते. ही नारंगी बर्फी कशी बनवायची पाहूया रेसिपी (Recipe)

1. साहित्य

  • संत्री - ५

  • मावा - १/२ किलो

  • काजू - १ टेबलस्पून

  • बदाम - १ टेबलस्पून

  • साखर - ४०० ग्राम

  • कस्टर्ड - १ टीस्पून

  • किसलेले खोबरे - १/४ कप

  • तूप - १ टेबलस्पून

  • वेलची पावडर - १ टीस्पून

2. कृती

  • संत्र्याची बर्फी बनवण्यासाठी संत्री सोलून वेगळी करा. यातील बिया काढून आतील भाग भांड्यात ठेवा.

  • यानंतर मध्यम आचेवर पॅन गरम करुन त्यात मावा मॅश करुन घाला. त्यानंतर साखर घालून ५ ते ६ मिनिटे शिजवून घ्या.

  • माव्याचा रंग सोनेरी होईपर्यंत शिजवून घ्या. यानंतर कढईत संत्रीचे सारण घाला. व्यवस्थित मिक्स करुन घ्या.

  • यामध्ये किसलेले खोबरे घालून मिक्स करा. मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात तूप आणि वेलची पूड घालून चांगले मिक्स करा. मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करा.

  • ताटाला तुपाने ग्रीस करा. तयार मिश्रण ट्रेमध्ये ओता आणि सर्व बाजूने मिश्रण समप्रमाणात पसरवा.

  • त्यानंतर काजू आणि बदामाचे काप घालून बर्फी सेट करा. वरुन चांदीचा वर्ख लावा. बर्फी सेट झाल्यानंतर त्याचे पीस कट करा. तयार आहे संत्र्याची बर्फी.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माझ्या विजयाचं लीड ५ हजारांंपेक्षा जास्त असेल - श्रद्धा जाधव

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT