Healthy Ladoo Recipe : बद्धकोष्ठता आणि गॅसेसच्या समस्यांनी त्रस्त आहात? या लाडूची चव चाखून पाहाच, सगळे आजार होतील दूर

Constipation Remedies : हिवाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर आपल्या डिहायड्रेशनची समस्या सतावू लागते. तसेच पुरेशा प्रमाणात पाणी न प्यायल्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसेसच्या समस्यांना देखील सामोरे जावे लागते.
Healthy Ladoo Recipe
Healthy Ladoo RecipeSaam Tv
Published On

Ragi Ladoo Recipe :

हिवाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यावर आपल्या डिहायड्रेशनची समस्या सतावू लागते. तसेच पुरेशा प्रमाणात पाणी (Water) न प्यायल्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसेसच्या समस्यांना देखील सामोरे जावे लागते.

या ऋतूमध्ये पौष्टिक आणि चवदार खायचे असेल तर आहारात नाचणीचा समावेश करायला हवा. याच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत होते. नाचणीमध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि आहारातील फायबर यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. याच्या सेवनाने शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते. नाचणीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर (Benefits) आहे. याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता आणि गॅसेसच्या समस्यांपासून सुटका होते. कसे बनवायचे नाचणीचे लाडू पाहूया रेसिपी (Recipes) .

1. साहित्य

  • नाचणीचे पीठ - १ कप

  • गूळ - १/२ कप

  • तूप - १/२ कप

  • बदाम - 8-10

  • काजू – 8-10

Healthy Ladoo Recipe
उरलेल्या Christmas Cake च काय कराल? झटपट रेसिपी बनवा, घरातले आवडीने खातील

2. कृती

  • नाचणीचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी काजू आणि बदामांचे छोटे तुकडे करून एका भांड्यात बाजूला ठेवा.

  • आता एक कढई घ्या आणि त्यात तूप घाला त्यात नाचणीचे पीठ घालून चांगले मिक्स करा. 1-2 मिनिटे पीठ मध्यम आचेवर शिजवा.

  • पिठाचा वास येऊ लागला की, त्यात चिरलेले काजू आमि बदाम घालून मिक्स करा. पुन्हा पीठ भाजून गॅस बंद करा.

  • भाजलेले पीठ थंड झाल्यानंतर त्यात वितळवलेला गूळ घाला. गूळाला चांगले मिक्स करुन घ्या.

  • नंतर दोन्ही हातांनी थोडे मिश्रण घेऊन लाडू बांधायला सुरुवात करा. नियमितपणे याचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची आणि गॅसेसची समस्या दूर होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com