Bhopla(Pumpkin) Soup Recipe in Marathi  Pumpkin Soup Recipe - Saam Tv
लाईफस्टाईल

Pumpkin Soup Recipe : हिवाळ्यातील अनेक आजारांवर रामबाण ठरेल भोपळ्याचे सूप, रोगप्रतिकारशक्ती ही वाढेल; पाहा रेसिपी

Bhopla(Pumpkin) Soup Recipe in Marathi: हिवाळ्यात बदल्या ऋतूनुसार आरोग्याच्या अनेक समस्यांना समोरे जावे लागते. सर्दी-खोकला आणि ताप यांसारख्या अनेक समस्या समोर येतात.

कोमल दामुद्रे

How To Make Pumpkin Soup :

हिवाळ्यात बदल्या ऋतूनुसार आरोग्याच्या अनेक समस्यांना समोरे जावे लागते. सर्दी-खोकला आणि ताप यांसारख्या अनेक समस्या समोर येतात. अशावेळी घशाला आराम मिळण्यासाठी आपण गरम पदार्थांचे सेवन करतो.

जर तुम्ही या वेळी सूप प्यायले तर घशाला आराम मिळेलच पण शरीराला ऊर्जा देखील मिळेल. सर्दी-खोकल्यामुळे अनेकदा भूक कमी लागते. त्यासाठी तुम्ही सूप पिऊ शकता. भोपळ्याचे सूप तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. तसेच सर्दी-खोकल्यापासून आरामही मिळेल. जाणून घेऊया क्रिमी पम्पकिन सूपची रेसिपी.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. साहित्य

  • भोपळा- २०० ग्रॅम

  • खरबूज बिया- १/४ कप

  • फ्रेश क्रिम - अर्धा कप

  • लोणी - ३ चमचे

  • काळी मिरी - चवीनुसार

  • कांदा (Onion) - १

  • आले-लसूण (Garlic) पेस्ट - १ चमचा

  • मिरची - १

  • मीठ चवीनुसार

2. कृती

  • भोपळ्याचे सूप बनवताना भोपाळा सोलून धुवून घ्या. आता कुकरमध्ये बटर, वितळवलेले लोणी घाला.

  • नंतर त्यात कांदा, आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. कांदा हलका तपकिरी रंगाचा झाल्यावर त्यात भोपळ्याचे तुकडे घाला. थोडे पाणी (Water) घालून २ ते ३ शिट्ट्या होऊ द्या.

  • कुकरमधील मिश्रण काढून त्याला ब्लेंड करुन घ्या. पॅन गरम करुन त्यात लोणी घाला.

  • त्यात सूप घालून क्रीम घाला. उकळी आल्यानंतर कोथिंबीर घालून सर्व्ह करा. काळीमिरी घालून सर्व्ह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Sneha Wagh: आता मुंबई आपलीशी वाटत नाही...; यूपीतून परत आल्यावर अभिनेत्री स्नेहा वाघ असं का म्हणाली?

High cholesterol symptoms: डोळ्यापासून-पायांपर्यंत...! पाहा शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यावर कोणत्या अवयवांमध्ये दिसतात लक्षणं?

Diwali Lakshmi Pujan: लक्ष्मीपूजनात राशीनुसार करा हे खास उपाय, भरपूर पैसा अन् सुख- समृद्धी मिळेल

Fraud Case : शिंदेसेनेच्या कार्यकर्त्याचा व्यावसायिकाला १३ लाखांचा गंडा, फसवणुकीचा प्रकार उघड, नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT