New Cancer therapy SAAM TV
लाईफस्टाईल

New Cancer therapy: आता पुन्हा कॅन्सर होण्याची चिंता मिटणार? तज्ज्ञांनी शोधणी नवी थेरपी, शरीरात असं करेल काम!

Personalized cancer vaccine: मेलानोमा कॅन्सर शस्त्रक्रियेनंतर पुन्हा होण्याचा धोका कमी करण्यासाठी मॉडर्ना आणि मर्कच्या mRNA आधारित पर्सनलाइज्ड थेरपीने फेज-3 क्लिनिकल ट्रायलमध्ये आशादायक परिणाम दाखवले. प्रत्येक रुग्णाच्या कॅन्सरमधील म्युटेशननुसार तयार होणारी ही थेरपी कशी काम करते जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सरची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि शरीरातून कॅन्सर पूर्णपणे काढून टाकला, तरीही रुग्ण आणि डॉक्टरांची चिंता संपत नाही. कारण कॅन्सर पुन्हा होण्याची शक्यता असते. विशेषतः मेलानोमा या स्किन कॅन्सरमध्ये उपचारानंतरही काही कॅन्सर पेशी शरीरात राहिल्या तर त्या पुन्हा वाढू शकतात किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतात.

अशा रुग्णांसाठी आता एक आशादायक बातमी समोर आलीये. मॉडर्ना आणि मर्क या कंपन्यांनी तयार केलेल्या नव्या कॉम्बिनेशन थेरपीने फेज-3 क्लिनिकल ट्रायलमध्ये चांगले परिणाम दाखवले आहेत. ही mRNA आधारित पर्सनलाइज्ड थेरपी असून, शस्त्रक्रियेनंतर मेलानोमा पुन्हा होण्याचा धोका कमी करण्यासाठी ती उपयोगी ठरू शकते.

दोन उपचार एकत्र करून तयार करण्यात आली थेरपी

या उपचारामध्ये मॉडर्नाची पर्सनलाइज्ड कॅन्सर लस इंटिस्मेरन आणि मर्क कंपनीची कीट्रुडा ही औषध एकत्र दिली जाते. या थेरपीची खासियत म्हणजे ती प्रत्येक रुग्णासाठी त्याच्या कॅन्सरनुसार तयार केली जाते. त्यासाठी सर्वप्रथम रुग्णाच्या ट्यूमरची तपासणी केली जाते. ट्यूमरमध्ये कोणते खास आनुवंशिक बदल म्हणजेच म्युटेशन आहेत, हे शोधले जातं.

प्रत्येक रुग्णाच्या कॅन्सरमध्ये वेगवेगळे म्युटेशन असू शकतात. त्यामुळे त्यानुसार संबंधित रुग्णासाठी वेगळी mRNA थेरपी तयार केली जाते. ही थेरपी शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेला म्हणजेच इम्यून सिस्टमला एक्टिव्ह करण्याचं काम करतं. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक पेशींना कॅन्सरच्या पेशी ओळखता येतात आणि त्यांच्यावर हल्ला करता येतो.

फेज-3 ट्रायलमध्ये काय आढळलं?

या फेज-3 क्लिनिकल ट्रायलमध्ये अशा मेलानोमा रुग्णांचा समावेश करण्यात आला होता, ज्यांचा कॅन्सर शस्त्रक्रियेद्वारे पूर्णपणे काढून टाकण्यात आला होता. शस्त्रक्रियेनंतर या रुग्णांना इंटिस्मेरन आणि कीट्रुडा यांचं कॉम्बिनेशन देण्यात आलं होतं. ट्रायलच्या निकालांमध्ये या उपचारांमुळे कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका कमी होण्यास मदत झाल्याचं दिसून आलं.

या अभ्यासामुळे प्रत्येक रुग्णाच्या कॅन्सरच्या वैशिष्ट्यांनुसार उपचार करण्याच्या पर्सनलाइज्ड पद्धतीला आणखी बळ मिळाले आहे.

प्रत्येक रुग्णासाठी वेगळी थेरपी

आतापर्यंत अनेक कॅन्सरवरील औषधं मोठ्या संख्येने रुग्णांना लक्षात घेऊन तयार केली जातात. म्हणजे कॅन्सरचा प्रकार समान असला, तरी प्रत्येक रुग्णाच्या कॅन्सरमधील म्युटेशन वेगवेगळे असू शकतात आणि तरीही त्यांना एकसारखे उपचार दिले जाऊ शकतात.

मात्र या नव्या पद्धतीमध्ये रुग्णाच्या ट्यूमरची तपासणी करून त्यामध्ये असलेले म्युटेशन ओळखलं जातं. त्यानंतर त्या रुग्णासाठी योग्य अशी mRNA थेरपी तयार केली जाते. विशेषतः शस्त्रक्रियेनंतर मेलानोमा पुन्हा होण्याचा धोका असलेल्या रुग्णांसाठी ही पद्धत भविष्यात महत्त्वाची ठरू शकते.

याआधीच्या ट्रायलमध्येही मिळाले होते चांगले परिणाम

फेज-3 ट्रायलच्या आधी या कॉम्बिनेशनची फेज-2b ट्रायल करण्यात आली होती. त्यातही चांगले परिणाम दिसून आले होते. या अभ्यासाच्या पाच वर्षांच्या फॉलो-अपमध्ये इंटिस्मेरन आणि कीट्रुडा एकत्र दिल्याने कॅन्सर पुन्हा होण्याचा किंवा रुग्णाच्या मृत्यूचा धोका 49 टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळलं. तसंच कॅन्सर शरीराच्या दूरच्या भागांमध्ये पसरण्याचा किंवा मृत्यूचा धोका 59 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले होते.

फेज-3 ट्रायलनंतर लगेच बाजारात येणार नाही

फेज-3 ट्रायलचे निकाल चांगले आले असले तरी याचा अर्थ ही थेरपी लगेच बाजारात उपलब्ध होईल, असा नाही. फेज-3 ट्रायलनंतर औषध किंवा थेरपी थेट बाजारात आणता येत नाही. कंपनीला ट्रायलमधील संपूर्ण डेटा आणि त्याचे परिणाम नियामक यंत्रणेकडे तपासणीसाठी सादर करावे लागतात. संबंधित देशाच्या आरोग्य आणि औषध नियामक विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच या उपचाराला बाजारात उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT