Diabetes Diet: ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवायचीये? मग आजच 'हे' 5 पदार्थ आहारातून करा बाहेर

Surabhi Jayashree Jagdish

डायबेटीज

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डायबिटीज आणि ब्लड शुगरशी संबंधित समस्या अधिक जाणवू शकतात. त्यामुळे या काळात आरोग्यासोबतच आपल्या खाण्यापिण्याकडेही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींनी काही पदार्थ शक्यतो टाळणं किंवा त्यांचं सेवन कमी करणं महत्त्वाचं ठरतं.

Diabetes During Monsoon | saam tv

गोड पदार्थ

डायबिटीज असलेल्या व्यक्तींना गोड पदार्थ खाणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांना त्रास होण्याची शक्यता असते.

Blood Sugar Control | saam tv

साधा पांढरा भात

तुम्हाला भात आवडत असेल आणि तुम्ही डायबिटीजचं रुग्ण असाल तर नेहमी भात खाणं टाळा. साध्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे त्याचा ब्लड शुगरवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

Diabetes Friendly Diet | saam tv

पॅकबंद पदार्थ टाळा

डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींनी पॅकबंद खाद्यपदार्थांपासून दूर राहावं. अशा पदार्थांमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असू शकतं. त्यामुळे डायबिटीजशी संबंधित समस्या वाढण्याची शक्यता असते.

White Rice and Diabetes | saam tv

फुल क्रीम दूध घेणं

दूध आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं मात्र डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींनी फुल क्रीम दुधाचं सेवन टाळावं. त्याऐवजी टोंड मिल्क घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे दूध घेताना त्याच्या प्रकाराकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.

Processed Foods | saam tv

फास्ट फूड खाऊ नका

आजकाल बर्गर, पिझ्झासारखे फास्ट फूड खाण्याचं प्रमाण वाढलंय. मात्र डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींनी अशा पदार्थांपासून दूर राहणं गरजेचं आहे. बर्गर आणि पिझ्झासारख्या पदार्थांमुळे डायबिटीजची समस्या वाढू शकते.

Burger and Diabetes | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Full Cream Milk | saam tv

Castor oil belly button: रात्री झोपताना नाभीमध्ये लावा एरंडेल तेल; हे 7 चमत्कारिक फायदे मिळतील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Castor oil period pain | saam tv
येथे क्लिक करा