Sleep Secrets  google
लाईफस्टाईल

Sleep Secrets: रात्री झोपताना एक पाय बाहेर काढण्याची सवय चांगली की वाईट? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

Night Relaxation: झोपताना एक पाय बाहेर काढणं केवळ सवय नाही, तर शरीराचं तापमान नियंत्रित करण्याचा नैसर्गिक उपाय आहे. त्यामुळे झोप अधिक खोल आणि आरामदायक लागते.

Sakshi Sunil Jadhav

झोपताना शरीराचं तापमान नैसर्गिकरीत्या कमी होतं.

पाय बाहेर ठेवल्याने उष्णता बाहेर जाते आणि शरीर थंड राहतं.

या प्रक्रियेमुळे झोप पटकन लागते आणि ती अधिक गाढ होते.

रात्रीची झोप ही शरीरासाठी खूप महत्वाची असते. आपण झोपायला जाताना शरीर आपोआप एका विशिष्ट स्थितीत आपोआप थांबते. काही लोक चादरीखाली पूर्णपणे झाकून घेतात, तर काहीजण झोपताना एक पाय किंवा पायाचा भाग चादरीबाहेर ठेवतात. लहानपणी आपण असं करण्याची हिम्मत केली नसती. कारण पलंगाखालील राक्षस पाय पकडेल, अशी भीती असायची! पण प्रौढ वयात ही सवय आपोआप लागते आणि ती फक्त सवय नाही, तर शरीराची एक फिजियॉलॉजिकल प्रतिक्रिया आहे.

तज्ज्ञांच्या मते, झोपताना आपल्या शरीराचे तापमान नैसर्गिकरित्या सुमारे एक डिग्रीने कमी होते. हा तापमानातील बदल नीट झाला नाही, तर झोप खोल लागत नाही आणि रात्री वारंवार जाग येते. त्यामुळे शरीर आपोआपच तापमान नियंत्रित करण्यासाठी एक पाय बाहेर आपण काढतो. अशा वेळी पायातून उष्णता बाहेर जाते आणि शरीर लवकर थंड होते. त्यामुळे झोप पटकन लागते आणि ती स्थिती जास्त कंफ्रटेबल होते.

स्पॅनिश फार्मासिस्ट एलेना सांगतात, "जर शरीराचे तापमान कमी झाले नाही, तर झोप येणे कठीण होते आणि विश्रांतीची गुणवत्ता कमी होते." त्यामुळे शरीराचा हा छोटासा प्रयत्न म्हणजे पाय बाहेर ठेवणे हा नैसर्गिक तापमान नियंत्रणाचा एक उपाय आहे. आपल्या हातपायांमध्ये रक्तवाहिन्यांचे जाळे असतात आणि त्यांच्यामध्ये स्नायूंची इन्सुलेशन कमी असते, त्यामुळे उष्णता बाहेर जाण्यासाठी हे भाग सर्वात प्रभावी ठरतात.

रात्री गरम वातावरणात झोपताना अनेकांना पूर्णपणे झाकून झोपायचं आवडतं, तर काहीजण हलक्या चादरीत झोपतात. पण एक पाय बाहेर ठेवणे ही अशी स्थिती आहे जी आराम आणि थंडावा या दोन्हींचा समतोल राखते. चादरीचा स्पर्शही राहतो आणि उष्णतेमुळे त्रासही होत नाही. म्हणून आज रात्री झोपताना एकदा प्रयत्न करून पाहा पायाला थोडी हवा द्या, थोडी मोकळीक द्या. कदाचित तीच छोटी सवय तुम्हाला अधिक गाढ, शांत आणि ताजेतवाने झोप देईल.

काही लोक झोपताना एक पाय बाहेर का काढतात?

शरीराचं तापमान नियंत्रित राहते. त्यामुळे झोप पटकन आणि खोल लागते.

झोपण्याची ही सवय आरोग्यासाठी चांगली आहे का?

होय, कारण ती शरीराचं नैसर्गिक थर्मोरेग्युलेशन सुधारते आणि झोपेची गुणवत्ता वाढवते.

सगळ्यांनीच असं झोपायला हवं का?

नाही, प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. ज्यांना गरम वातावरण त्रासदायक वाटतं, त्यांच्यासाठी हा उपाय उपयोगी ठरतो.

झोप सुधारण्यासाठी आणखी काय करता येईल?

झोपायच्या आधी स्क्रीनपासून दूर राहा, हलकी चादर वापरा आणि खोलीचं तापमान नॉर्मल ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे फर्निचर दुकानासह लॉजला लागली आग

Budget Tour: काय सांगता? इथे 1 रुपयाची किंमत तब्बल 300 रुपये... खिशात फक्त 1000 रुपये ठेवा अन् परदेश फिरा

मातोश्रीवर ड्रोन उडवल्याने खळबळ; अविनाश जाधवांचा सरकारवर हल्लाबोल|VIDEO

6,6,6,6,6,6,6,6...षटकारांचं वादळ, 11 चेंडूत ८ षटकार; युवा फलंदाजाचा विश्वविक्रम

Maharashtra Politics: जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपये बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा|VIDEO

SCROLL FOR NEXT