Sakshi Sunil Jadhav
आयलायनर लावणे हे मेकअपमधील सर्वात कठीण आणि आकर्षक टप्पा असतो. एक छोटी चूक संपूर्ण लुक बिघडवू शकते. म्हणूनच काही सोपे मेकअप हॅक्स पुढे देण्यात आल्या आहेत.
सर्वप्रथम डोळ्याभोवती प्रायमर लावा, त्यामुळे आयलायनर जास्त वेळ टिकतो. पेन्सिल आयलायनर वापरत असाल तर तो थोडा शार्प ठेवा, ज्यामुळे रेषा नेमकी दिसते.
लिक्विड आयलायनरसाठी सुरुवात आतून नव्हे तर बाहेरून करा, त्यामुळे शेप बिघडत नाही.
विंग्ड लुकसाठी सेलो टेपचा वापर करा, त्यामुळे दोन्ही बाजू समसमान दिसतात.
आयलायनर लावताना हात टेबलवर ठेवा, त्यामुळे हात थरथरत नाही. जाड रेषा हवी असल्यास आधी बारीक रेषा काढा आणि हळूहळू जाडी वाढवा.
आयशॅडोशी मॅचिंग कलरचा आयलायनर वापरल्यास डोळ्यांना अधिक डेप्थ मिळेल. आयलायनर सुकल्यावर त्यावर ट्रान्सलूसंट पावडर लावा, त्यामुळे तो स्मज होत नाही.
मेकअप रिमुव्ह करताना कॉटन स्वॅबने एजेस नीट क्लीन करा, त्यामुळे लुक परफेक्ट दिसतो.
छोट्या पण प्रभावी टिप्स वापरल्यास आयलायनर लावणे सहज शक्य होते आणि डोळ्यांना आकर्षक, प्रोफेशनल फिनिश मिळते.