Sakshi Sunil Jadhav
दिवाळीच्या सुट्टीत तुम्हाला वन डे पिकनिक प्लान करायचा असेल तर नाशिकजवळील ४५ किमीवर असलेली सुंदर ठिकाणे पाहता येतील.
काळराम मंदीर हे २४५ फुट लांब आणि १४५ फुट रुंद मंदिर आहे. हे ऐतिहासिक मंदिर तुम्ही नक्की दिवाळीच्या सुट्टीत पाहून येऊ शकता.
खंडोबा मंदिर हे देवळाली छावणी परिसरातले लहान टेकडीवर वसलेले सुंदर मंदिर आहे. हे मंदिर ५०० वर्षे जूने असल्याचे सांगितले जाते.
कावनई-कपिलधारा तिर्थक्षेत्र हे इगतपुरी तालुक्यात आहे. हे नाशिकपासून ५० किमी अंतरावर आपल्याला पाहायला मिळेल.
चांभारलेणे हा ११ व्या शकतला मंदिरांचा समुह तुम्ही पाहू शकता. नाशिक शहराच्या बाह्य भागाता रामशेज किल्ल्याजवळ असणाऱ्या टेकडीवर ही मंदीरे आहेत.
तपोवन म्हणजे तपस्वी लोकांचे वन हे ठिकाण नाशिकच्या पंचवटी पंचवटी पासून १.५ किमी अंतरावर खालच्या बाजुच्या गोदावरी नदी तिरी आहे.
मुक्तिधाम हे नाशिक शहरात नाशिकरोड रेल्वेस्टेशनजवळ आहे. या मंदिराचे बांधकाम पांढऱ्या रंगाच्या संगमरवरी दगडांत केले आहे. येथे १२ ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती स्थापित करण्यात आलेली आहे.
धम्ममागिरी एक ध्यान केंद्र आहे. विपश्यनामध्ये भारतातील बुद्ध २५०० वर्षांपूर्वी शिकवलेल्या तंत्रात अभ्यासक्रम देते.