Kidney Detox Drinks  saam tv
लाईफस्टाईल

Kidney Detox Drinks: वेट लॉस ते किडनी Detox; 'या' भाज्याचं ज्यूस प्या, तब्येत राहिल फिट, आजार छुमंतर

Diabetes Control Drink: कारल्याचा रस किडनी डिटॉक्स, वजन नियंत्रण, रक्तातील साखर कमी करणे आणि त्वचेचा ग्लो वाढविण्यासाठी उपयुक्त मानला जातो. तज्ज्ञांच्या मते त्याचे दैनंदिन सेवन आरोग्यास फायदेशीर ठरते.

Sakshi Sunil Jadhav

कारल्याचा रस किडनीचे कार्य सुधारतो.

डायबिटीज रुग्णांसाठी कारलं नैसर्गिक साखर नियंत्रण उपाय आहे.

वजन कमी, त्वचा ग्लो आणि मेटाबोलिझम सुधारण्यासाठी कारल्याचा रस उपयुक्त.

कारल्याची भाजी महाराष्ट्रातला प्रत्येक घरात तयार केली जाते. कारल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे असतात. दररोज कारल्याचा रस प्यायल्याने किडनीचे कार्य सुधारते. विशेष म्हणजे डायबेटीज असलेल्यांसाठी कारलं खूप फायदेशीर असते. कारण कारलं खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. तसेच किडनी फिल्टरिंग सुधारण्यासाठी याचा फायदा होतो. पुढे आपण कारल्याचे सेवन कोणत्या रुग्णांनी जास्त प्रमाणात केले पाहिजे. याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

तज्ज्ञांच्या मते ज्यांना किडनीच्या समस्या आहेत. त्यांनी दैनंदिन आयुष्यात कारल्याचा समावेश केला पाहिजे. त्यासाठी कडू कारल्याचा रस फायदेशीर ठरतो. फोलेट, झिंक, पोटॅशियम, आयरन, आणि व्हिटॅमिन सीचा समावेश कारल्यात असतो. 87% कारल्याचा रस प्यायल्याने शरीरातील अॅंटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण वाढते, मेंदूचे कार्य सुधारते.

कारल्याचा रस प्यायल्याने कोणकोणते फायदे होतात?

ब्लड शुगर लेव्हल

शरीरातील ब्लड शुगर लेवल कमी करण्यासाठी तुम्ही कारल्याचा रस पिऊ शकता. याने टाईप २ डायबिटीजचे प्रमाण कमी होते. नियमित किमान १ कप या रसाचे सेवन केले पाहिजे.

त्वचेतील बदल

तुम्हाला नॅचरली ग्लोइंग स्कीन हवी असेल तर तुम्ही रोज कारल्याच्या रसाचे सेवन करू शकता. महागड्या प्रोडक्ट्सपेक्षा हा सगळ्यात सोपा उपाय राहील. अॅंटीऑक्सि़डंट्सने परिपुर्ण अशी ही भाजी आहे.

वजन कमी

तज्ज्ञांच्या मते तुम्ही कारल्याचा रस नियमित सेवन करत असाल तर तुमचा फॅट वाढत नाही. वजन नियंत्रणात राहते आणि विशेष डाएट करण्याचीही वेळ येत नाही.

कारल्याचा रस कसा बनवायचा?

सर्वप्रथम कारलं नीट धुवून घ्या. मग उभे बारिक काप करून घ्या. त्यातल्या बिया काढून टाकायला विसरू नका. उरलेला हिरवा भाग मिक्सरमध्ये टाका. त्यामध्ये पाणी ओता. चव वाढवण्यासाठी थोडा लिंबाचा रस, मीठ आणि अर्धा चमचा मध घाला. आता सर्व मिश्रण बारिक वाटून घ्या. वाटलेला रस गाळनीने गाळून तुमचा काढा तयार होईल. जर तुम्हाला काढ्याने पोटाच्या समस्या जाणवल्या तर त्याचे सेवन करणे टाळा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिर्डीत झाडावर अवतरले साई? साईंच्या दर्शनासाठी उसळली गर्दी

स्मृती मंधाना-पलाशचं लग्न कुणामुळं पुढं ढकललं? संगीत सोहळ्याच्या रात्री काय घडलं? नवरदेवाच्या आईनं खरं कारण सांगितलं

Car Accident: भरधाव कारवरचा कंट्रोल सुटला, भीषण अपघातात IAS अधिकाऱ्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

कराडप्रेम धनुभाऊंना भोवणार? मुंडेंना पक्षातून काढा, सुळेंचा हल्लाबोल

Maharashtra Live News Update: निर्मला गावित अपघात प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT