sleep problems saam tv
लाईफस्टाईल

Insomnia Problems: रात्री ३ वाजता अचानक जाग येतेय? जाणून घ्या गंभीर कारण आणि उपाय

Sleep Health: रात्री झोपेतून ३ वाजता जाग येत असेल? जाणून घ्या झोप बिघडण्याची कारणे, तज्ज्ञांचे सल्ले आणि झोप सुधारण्यासाठी घरगुती उपाय.

Sakshi Sunil Jadhav

झोपेची वेळ बिघडल्यास रात्री वारंवार जाग येऊ शकते.

ताण, मोबाईलचा वापर, आणि चुकीच्या सवयींमुळे झोपेत व्यत्यय येतो.

झोपेची वेळ नियमित ठेवा आणि शांत वातावरण तयार करा.

एका अमेरिकन संशोधनानुसार, ३५.५ टक्के लोकांना आठवड्यातून तीन वेळा तरी अशा प्रकारची झोपेचे अडथळे येतात, तर २३ टक्के लोकांना रात्री अचानक जाग येते. जर तुम्हाला दररोज रात्री ३ वाजता जाग येत असेल आणि पुन्हा झोप लागत नसेल, तर त्यामागे काही अंतर्गत कारणं असू शकतात. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, मात्र त्यापूर्वी या समस्येची संभाव्य कारणे समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

तज्ज्ञांच्या मते, शरीरातील नैसर्गिक जैविक घड्याळ म्हणजेच सर्केडियन रिदम बिघडल्याने अनेकदा रात्री वारंवार जाग येऊ शकते. शरीराची झोप आणि जागे राहण्याची वेळ मुख्यतः प्रकाश आणि अंधारावर अवलंबून असते. हे संतुलन बिघडल्यास मेलाटोनिन नावाच्या झोपेसाठी जबाबदार हार्मोनचे प्रमाण बदलते. त्यामुळे झोप लागायला वेळ लागतो किंवा अचानक झोपमोड होते.

झोपमोड होण्याची कारणे म्हणजे, चुकीची झोपेची वेळ, स्ट्रेस, आजारपणं, औषधांचे दुष्परिणाम, जास्त प्रमाणात मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर, खोलीचे तापमान, आवाज किंवा अस्वस्थ वातावरण. सतत अशी झोप बिघडत राहिल्याने थकवा, लठ्ठपणा, मधुमेह, नैराश्य आणि दीर्घकालीन झोपेचे विकार होऊ शकतात. त्यामुळे नियमित झोपेची सवय ठेवणे गरजेचे आहे.

झोप सुधारण्यासाठी उपाय

दररोज ठरलेल्या वेळी झोपायला जा आणि उठण्याची सवय ठेवा. झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा वापर टाळा.

कॅफिन, निकोटिन आणि मद्यपान कमी करा. नियमित व्यायाम करा आणि दिवसात नैसर्गिक सूर्यप्रकाश घ्या. झोपण्यासाठी खोली शांत, स्वच्छ आणि थंड ठेवा. झोपण्यापूर्वी ध्यान, श्वसन किंवा रिलॅक्सेशन तंत्रांचा वापर करा. या काही सोप्या सवयी अंगीकारल्यास तुमची झोप जास्त चांगली आणि सखोल होऊ शकते. वारंवार रात्री जाग येत असल्यास किंवा झोप न लागल्यास तज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: गुंडाच्या परिवारावर अजितदादा मेहरबान; गुंडांच्या बायका निवडणुकांच्या मैदानात

BMC Election: ठाकरेंच्या मतदारसंघात असंतोषाचा भडका; निवडणुकीत पत्ता कट, नाराजांच्या कोलांट उड्या

Vande Bharat sleeper Train: जबरदस्त! वंदे भारत ट्रेनचा १८० किमीचा स्पीड, सुसाट वेगातही पाण्याचा ग्लास राहिला जशास तसा; Water Taste व्हिडिओ व्हायरल

RPI चा अपमान, रामदास आठवलेंचा संताप; नाराजीनंतर भाजपची धावाधाव, VIDEO

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT