Sunscreen Benefits In Summer Season Saam tv
लाईफस्टाईल

Sunscreen Benefits In Summer Season : उन्हाळ्यात सनस्क्रीन का लावावे ? त्वचेला त्याचा फायदा होतो का ?

Which Sunscreen is Best : सनस्क्रीन त्वचेला का लावावे ? याचा त्वचेला कसा फायदा होतो हे जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Summer Skin Care Tips : कडाक्याच्या उन्हात त्वचेची काळजी घेण्यासाठी बरेचदा आपल्या सनस्क्रीन लावण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, सनस्क्रीन त्वचेला का लावावे ? याचा त्वचेला कसा फायदा होतो हे जाणून घेऊया.

उन्हाळ्यात सनबर्न व अतिनील किरणांपासून वाचण्यासाठी चेहऱ्याला सनस्क्रीन लावण्यास सांगितले जाते. आपल्या त्वचेचे आरोग्य (Health) आणि सौंदर्य टिकविण्याचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग म्हणजे दररोज आपल्या चेहऱ्याला (Skin) सनस्क्रीन लावावे. परंतु, काही वेळेस सनस्क्रिन लावण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात त्वचेचे नुकसान होते. तसेच सनस्क्रीन का लावावे? कोणत्या प्रकारचे सनस्क्रीन खरेदी करावे याबाबत जाणून घेऊया डॉ. रिंकी कपूर यांच्याकडून

1. सनस्क्रीन न लावल्यास काय होते ?

1. त्वचेचा कर्करोग (Cancer) :

सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेच्या पेशी खराब होऊ शकतात आणि त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. सनस्क्रीन वापरल्याने अल्ट्राव्हायोलेट किरणांचा संपर्क कमी होतो आणि त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका निम्म्यापर्यंत कमी होतो.

2. फोटोएजिंग :

अतिनील किरणांमुळे त्वचेचा पोत, रंग बदलतो. अतिनील किरणांमुळे कोलेजेन आणि इलास्टिन कमी होते यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडणे, काळवंडणे आणि त्वचा रुक्ष व निस्तेज वाटू लागते. जे लोक दररोज सनस्क्रीन योग्य प्रकारे वापरतात त्यांच्यात वृद्धत्वाची लक्षणे दिसण्याची शक्यता 24% कमी असते.

3. स्किन टोन :

सनस्क्रीन हे टॅनिंग आणि जास्त मेलानिन उत्पादन टाळण्यास मदत करते आणि त्यामुळे त्वचेचा टोन समान राखण्यास मदत होते.

2. वापर कसा कराल ?

  • कोणत्याही ऋतूमध्ये सनस्क्रीनचा वापर करायला हवा. सूर्याची किरणे अति घातक असतात यासाठी त्वचेला सनस्क्रीन लावायला हवी.

  • बर्फ हानीकारक अतिनील किरणांपैकी 80% परावर्तित करतो आणि त्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता वाढते.

  • तुम्ही प्रवास करताना म्हणजे विमानातून प्रवास करत असाल तर सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे कारण तुम्ही विमानात असलात तरीही सूर्यकिरण कोणत्याही फिल्टरशिवाय तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत.

  • तुमची त्वचा काळी असली तरीही तुम्हाला दररोज सनस्क्रीन लावावे लागेल.

  • सनस्क्रीन 2-3 तासांनी पुन्हा लावणे आवश्यक आहे. केमिकलयुक्त सनस्क्रीन लवकर निघते किंवा घाम सुटते.

3. कोणते सनस्क्रीन खरेदी करायचे?

  • ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीनचा वापर करा. सनस्क्रीनच्या अतिनील प्रकाशापासून वाचवण्यास मदत करते. ते त्वचेच्या पेशींचे नुकसान करतात आणि अकाली वृद्धत्वास कारणीभूत ठरतात. दैनंदिन बेसवर ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन त्वचेच्या पेशींचे संरक्षण करते. ब्रॉड स्पेक्ट्रम UVA आणि UVB या दोन्ही किरणांपासून संरक्षण करते.

  • फिजीकल सनस्क्रीनमध्ये झिंक ऑक्साईड किंवा टायटॅनियम डायऑक्साइडचे बनलेले असतात. जे त्वचेच्या पृष्ठभागावर संरक्षणाचा एक थर तयार करता. तसेच, फिजीकल सनस्क्रीन पाण्याला अधिक प्रतिरोधक असतात.

  • रासायनिक सनस्क्रीन सूर्यकिरणांना दूर ठेवतात. हे घरामध्ये वापरण्यासाठी देखील चांगले आहेत. जर तुम्हाला पुरळ किंवा रोसेसिया होण्याची शक्यता असेल तर त्यांचा वापर टाळा.

  • चेहरा धुतल्यानंतर सनस्क्रीनचा वापर पुन्हा लावणे आवश्यक आहे. तसेच 30 किंवा त्याहून अधिक एसपीएफ वापरा कारण ते सूर्यकिरणांपासून सुमारे 97% संरक्षण देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT