सौरमालेतील कोणत्या ग्रहावर दिवस सर्वात मोठा असतो?

Surabhi Jayashree Jagdish

मोठा दिवस

शुक्र ग्रहावर सर्वात मोठा दिवस असतो आणि तो आपल्या सौरमालेतील दुसरा ग्रह आहे. या ग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा दिवस पृथ्वीवरील दिवसांच्या तुलनेत अत्यंत मोठा असतो.

२४३ दिवसांच्या बरोबरीचा दिवस

शुक्र ग्रहावर एक दिवस पृथ्वीवरील सुमारे २४३ दिवसांच्या बरोबरीचा असतो. म्हणजेच पृथ्वीवर जवळपास आठ महिने जसे होतात, तितका कालावधी शुक्रावरील एका दिवसाचा असतो. इतका लांब दिवस असलेला हा एकमेव ग्रह आहे.

कारण

शुक्र ग्रहावर दिवस इतका मोठा असण्याचं कारण म्हणजे तो स्वतःच्या अक्षाभोवती खूप हळूहळू फिरतो. या मंद गतीमुळे त्याला स्वतःचा एक फेरी पूर्ण करायला खूप वेळ लागतो. त्यामुळे त्याचा दिवस इतका मोठा बनतो.

हळू फिरणारा ग्रह

हा ग्रह सौरमालेतील सर्वात हळू फिरणारा ग्रह मानला जातो. इतर ग्रहांच्या तुलनेत त्याची फिरण्याची गती अत्यंत कमी आहे. याच कारणामुळे त्याच्या दिवस आणि रात्रीचा कालावधी अत्यंत प्रदीर्घ असतो.

उष्ण ग्रह

शुक्र सौरमालेतील सर्वात उष्ण ग्रह आहे. त्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे ४७५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचते. इतकं तापमान कोणत्याही अन्य ग्रहावर आढळत नाही.

कार्बन डायऑक्साइड

शुक्र ग्रहाचं वातावरण कार्बन डायऑक्साइडने भरलेलं असतं. या वायूमुळे ग्रीनहाऊस परिणाम निर्माण होतो आणि उष्णता अडकून राहते. त्यामुळे ग्रहाचा तापमान स्तर खूपच वाढतो.

जीवन शक्य नाही

ग्रीनहाऊस परिणामामुळे शुक्रावर अत्यंत उष्ण वातावरण तयार झालेलं असतं. पृष्ठभागावर प्रखर उष्णता असल्यामुळे तिथे कोणत्याही प्रकारचं जीवन शक्य नाही.

वायुमंडलीय दाब

शुक्र ग्रहाचं वायुमंडलीय दाब पृथ्वीपेक्षा सुमारे ९० पट जास्त आहे. इतक्या तीव्र दाबाखाली कोणताही मानव किंवा यंत्र दीर्घकाळ टिकू शकत नाही. त्यामुळे शुक्र ग्रहावर मानवी अस्तित्व अशक्य आहे.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा