Home Remedies For Stomach Growling Saam tv
लाईफस्टाईल

Home Remedies For Stomach Growling : जेवल्यानंतर पोटातून गुडगुड आवाज येतोय ? असू शकतो धोकादायक आजार, या घरगुती उपायांनी मिळेल आराम

Home Remedies For Stomach Problem : बरेचदा जेवल्यानंतरही पोटातून आवज येत असेल तर...

कोमल दामुद्रे

Stomach Problem : अनेकदा भूक लागल्यानंतरही आपण जेवण करणे टाळतो यामुळे पोटातून आवाज येऊ लागतो पण बरेचदा जेवल्यानंतरही पोटातून आवज येत असेल तर... काही खाल्ल्यानंतर पोटातून असा आवाज येणे साहाजिक आहे.

खूप वेळ उपाशी राहिल्यानंतर काही वेळा पदार्थ खाल्ल्यास आतडे व स्नायूंच्या आकुंचन आणि पचनसंस्थेमध्ये गॅस तयार होतो. ज्यामुळे पोटातून (Stomach) आवाज येऊ लागतो. जर अशी समस्या तुम्हाला वारंवार जाणवत असेल तर तुमच्या खाण्यापिण्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात चुकांमुळे असे होऊ शकते. ज्याचा तुमच्या आतड्यांवर आणि पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो.

आहारतज्ज्ञ एरिन केनी यांच्या मते साधी वाटणारी समस्या असू शकते परंतु, काही वेळा ही अधिक गुंतागुंतीची असते. ही पचन किंवा पोटाच्या समस्येचे लक्षण असू शकते. असे का होते हे जाणून घेऊया

1. अधिक प्रमाणात पाणी पिणे

उभे राहून किंवा घाई घाईत पाणी (Water) प्यायल्याने आपल्या पोटात गॅस तयार होतो. कमी वेळेत खूप कार्बोनेटेड पेय पिणे हे देखील कारण असू शकते. त्यामुळे पोटातून गुडगुड असा आवाज येऊ शकतो. त्यासाठी जेवताना पाणी पिणे टाळा

2. ऍसिड रिफ्लक्स किंवा जीईआरडी

ऍसिड रिफ्लक्स ही पचनासंबंधितची समस्या आहे. ज्यामध्ये खाल्ले अन्न पोटातून अन्ननलिकेत परत येऊ लागते. त्यामुळे अपचन, छातीत जळजळ, पोटात आग पडणे, उलट्या होणे यांसारख्या समस्यांना (Problem) सामोरे जावे लागू शकते.

3. Gastroparesis

गॅस्ट्रोपेरेसीस, ज्याला गॅस्ट्रिक देखील म्हणतात, हा एक विकार आहे जो पोटातून किंवा आतड्यांमध्ये कोणताही अडथळा नसता नाही, तुमच्या पोटातून तुमच्या लहान आतड्यात अन्नाची हालचाल मंदावतो किंवा थांबवतो.

4. पोटातून आवाज येत असल्यास काय कराल ?

  • तुम्हाला हा त्रास वारंवार होत असल्यास तुम्ही त्वरीत डॉक्टरांना भेटा.

  • एकाच वेळी भरपूर पाणी पिऊ नका.

  • पोट रिकामे ठेवून चहा कॉफीचे सेवन करु नका.

  • अन्न चावून पण हळूहळू खा

  • आंबट पदार्थ, दारू आणि धूम्रपान टाळा

  • गॅस निर्माण करणाऱ्या वस्तूंचे सेवन टाळा

  • शारीरिक हालचाल करा

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

TET Exam Result: महत्त्वाची बातमी! आज टीईटी परीक्षेचा निकाल| VIDEO

इंग्लडचं मैदान गाजवलं, पण आशिया कपमधून गिलला मिळणार डच्चू? अजित आगरकरांच्या मनात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT