How to Clean Stomach : सकाळी सकाळी पोट साफ होत नाही? वापरून पहा या टिप्स, दिवसभर राहाल फ्रेश

तुम्ही वेळीचं या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर, याचे गंभीर परिणाम तुम्हाला पाहावे लागतील
How to Clean Stomach
How to Clean StomachSaam Tv

How to Clean Stomach : सकाळचे पोट साफ नसेल तर पूर्ण दिवस खराब जातो. अयोग्य खानपान आणि खराब लाईफस्टाईलमुळे पोटामध्ये कफ तयार होतो.

ज्यामुळे पोट व्यवस्थीत साफ होत नाही. तुम्ही वेळीचं या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर, याचे गंभीर परिणाम तुम्हाला पाहावे लागतील. त्याचबरोबर तुमची पचनसंस्था बिघडेल. सोबतच आहारामध्ये फायबर युक्त पदार्थांचा समावेश करा आणि जास्त प्रमाणात पाणी प्या.

How to Clean Stomach
Constipation : सतत बद्धकोष्ठतेचा त्रास होतोय? तर शरीरावर होऊ शकतो परिणाम

1. माझं पोट व्यवस्थित साफ होत नाही आहे. अनेक औषधे घेतली परंतु आराम मिळाला नाही, यावर एखादा रामबाण उपाय सांगा ?

पोट साफ न होण्याचे अनेक कारण आहेत. आहारामधील (Food) फायबर युक्त पदार्थांचे कमीमुळे, योग्य प्रमाणात झोप न घेतल्यामुळे, निष्क्रियता, दुखू नये यासाठी सेवन केलेल्या गोळ्या, हे सगळ अशा प्रकारचे लक्षणांसाठी जबाबदार ठरू शकते. इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, कफ होणे हा कोणत्याही प्रकारचा आजार नाही आहे, हे एक शारीरिक विकारांचे लक्षण असू शकते. मुख्य रूपामध्ये कफची समस्या आपली जीवनशैली आणि खान पाण्याच्या पद्धतीला जोडलेली असते. जर वेळीच या गोष्टींवर उपाय केला नाही तर, पूर्ण शरीराला नुकसान पोहोचू शकते.

2. कफ दूर करण्याचा उपाय :

आहारामध्ये जास्त फायबरयुक्त पदार्थ सामील करा. ताजे फळ (Fruit), सलाड, डाळ यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा. सकाळी उठल्यावर एक ते दोन ग्लास कोमट पाणी पिणे देखील फायदेशीर ठरू शकते. दुपारच्या वेळी जेवणानंतर वीस ते तीस मिनिटे योगनिद्रेचा एक सत्र सुद्धा शरीराला योग्य प्रमाणात आराम देते. त्याचबरोबर मॉर्निंग वॉक आणि व्यायाम केल्याने आतड्यांचे स्वास्थ्य सुधारते. रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे हेसुद्धा कफच्या समस्येसाठी फायदेशीर ठरते.

Constipation
ConstipationSaam Tv

3. आयुर्वेदानुसार पोट कसे साफ करावे :

जर तुम्हाला कफचा प्रॉब्लेम असेल तर तुमच्यामध्ये आयुर्वेदानुसार (Ayurved) अग्नीमध्ये गडबडी आहे. हे दूर करण्यासाठी रात्रभर पाच आलूबुखारला पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळ झाल्यावर याचे सेवन करा. असं केल्याने तुम्हाला कफच्या समस्यापासून सुटकारा मिळेल.

4. माझे पोट रोज साफ का होत नाही :

दररोज पोट साफ न होणे याचे अनेक कारणे असू शकतात. जसे की झोप कमी येणे, डायट मध्ये फायबर युक्त पदार्थांचे सेवन नसणे, कोणत्याही प्रकारचे औषध घेणे, कमी प्रमाणात पाणी पिणे, अन्न व्यवस्थित न चावणे. इत्यादी कारणांमुळे तुमचे पोट साफ होत नाही.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com