Digestive problems caused by dairy products saam tv
लाईफस्टाईल

Gas after drinking milk: दूध प्यायल्यानंतर पोटात गॅस किंवा दुखणं होतं? जाणून घ्या यामागचं खरं कारण

Digestive problems caused by dairy products: दूध प्यायल्यानंतर काही लोकांना गॅस, पोट फुगणं किंवा पोटदुखीचा त्रास का होतो? तज्ज्ञांच्या मते यामागे लॅक्टोज इंटॉलरन्स हे कारण असू शकतं. या समस्येची लक्षणं आणि कारणांबद्दल जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

दूध हे आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतं. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील पहिला आहारही दूधच असतं आणि तो आईच्या दुधापासून सुरू होतो. त्यामुळे दूध हे ताकद आणि पोषण देणारे महत्त्वाचे अन्न मानले जाते. मात्र काही लोकांना दूध प्यायल्यानंतर पोटाशी संबंधित त्रास जाणवतो. काहींना पोटात गॅस होतो, पोट फुगल्यासारखे वाटतं, अपचन होतं किंवा पोटदुखी सुरू होते. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, दूधानंतर असा त्रास का होतो. आज आपण जाणून घेऊया कोणत्या लोकांनी दूध पिणं टाळावं.

दूध प्यायल्यानंतर गॅस का होतो?

दुधामध्ये लॅक्टोज नावाची नैसर्गिक साखर असते. ही साखर पचवण्यासाठी शरीराला 'लॅक्टेज' नावाच्या एन्झाइमची गरज असते. हे एन्झाइम लहान आतड्यात तयार होतं. मात्र काही लोकांच्या शरीरात या एन्झाइमचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे लॅक्टोज नीट पचत नाही. अशा वेळी दूध प्यायल्यानंतर पोटात गॅस होणं, पोट फुगणं, पोटदुखी किंवा जुलाब यांसारख्या समस्या दिसू शकतात.

लॅक्टोज इंटॉलरन्सची लक्षणं

जर एखाद्या व्यक्तीला दूध किंवा दूधापासून बनणारे पदार्थ जसं की, पनीर, लस्सी किंवा इतर डेअरी पदार्थ खाल्ल्यानंतर पोटाचा त्रास होत असेल तर ते लॅक्टोज इंटॉलरन्सचं लक्षण असू शकतं. यामध्ये पोटात गॅस होणं, पोट फुगल्यासारखे वाटणं, पोटात दुखणं, जुलाब होणं, तसंच मळमळ किंवा उलटीसारखे वाटणं अशी लक्षणे दिसू शकतात. सहसा ही लक्षणं दूध प्यायल्यानंतर ३० मिनिटांपासून २ तासांच्या आत जाणवतात.

कोणाला दूधामुळे त्रास होतो?

सर्वांनाच दूध प्यायल्यानंतर त्रास होतो असं नाही. मात्र काही लोकांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. ज्यांचं पचन तंत्र कमजोर असतं किंवा ज्यांना आधीपासून गॅस, अॅसिडिटी किंवा पोटाशी संबंधित समस्या असतात, त्यांना दूध पचवणं कठीण जाऊ शकतं. याशिवाय वय वाढल्यावर काही लोकांमध्ये दूध पचवण्याची क्षमता कमी होत जाते.

तज्ज्ञांच्या मते, लहान बाळासाठी आईचं दूध अत्यंत महत्त्वाचं असतं. साधारणपणे सहा ते सात महिन्यांपर्यंत बाळाला दूधाची गरज असते. त्यानंतर बाळ हळूहळू इतर पदार्थ खायला सुरुवात करतं. जर कोणाला दूधामुळे त्रास होत असेल तर शरीराला आवश्यक असलेलं प्रोटीन इतर अन्नपदार्थांमधूनही मिळवता येऊ शकतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arshdeep Singh: दिल नैयो लगदा! अर्शदीप सिंगची प्रेयसी समरीन कौर आहे तरी कोण?

आंदोलकांवर AK-47 चालवणाऱ्या पोलिसावर मोठी कारवाई! 200 विद्यार्थ्याही ताब्यात

Maharashtra News Live Update: सोनम वांगचुक राजघाटावर दाखल

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो 'ही' 3 महत्त्वाची कामे आजच करा; अन्यथा, पीएम किसानचा 24 वा हप्ता विसरा

Jana Nayagan: विजय थलापती यांच्या 'जन नायकन'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; अवघ्या 4 दिवसांत 200 कोटींचा टप्पा पार

SCROLL FOR NEXT