Dhanshri Shintre
आपल्या आहारात फळं, भाज्या, डाळी आणि कडधान्यांचा समावेश करून शरीराला आवश्यक सर्व पोषकतत्व मिळावीत हा मुख्य उद्देश असतो.
आहारात योग्य प्रमाणात, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने पदार्थ खावे, याची पुरेशी माहिती अनेकांना नसते.
फळं खाण्याची सर्वात योग्य वेळ सूर्यास्तापूर्वीची आहे, म्हणजेच दिवसभराच्या कोणत्याही वेळी संध्याकाळपूर्वी फळांचे सेवन करावे.
अनेकजण सकाळी उपाशीपोटी फळं खातात, पण त्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते, म्हणून अशी सवय टाळणे योग्य आहे.
पहिलं खाणं म्हणून आहारात प्रोटीन्स आणि फॅट्स घ्यावेत, त्यानंतर फळांचे सेवन केल्यास आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.
नाश्त्यानंतर आणि जेवणाच्या आधी फळं खायची असल्यास बेरीज, केळी आणि व्हिटॅमिन सीयुक्त आंबट फळे सर्वाधिक फायदेशीर ठरतात.
संध्याकाळी फळं खायची असल्यास सफरचंद, पेर यासारखी फायबरयुक्त फळे खाणे पचनासाठी आणि आरोग्यासाठी अधिक लाभदायक ठरते.
परदेशी किवी, ड्रॅगन फ्रूटपेक्षा सिताफळ, पपई, संत्री, केळी, आंबा, फणस यांसारखी फळे खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असते.