Dhanshri Shintre
आजकाल प्रत्येकजण घरातून नाश्ता करून बाहेर पडतो किंवा बाहेरच नाश्ता करण्याला प्राधान्य देताना दिसतो.
तज्ज्ञ सकाळी नाश्ता, दुपारी भरपेट जेवण आणि रात्री हलके जेवण घेण्याचा सल्ला देतात.
तुम्हाला माहित आहे का? नाश्त्याची संकल्पना सर्वप्रथम कुठे आणि केव्हा सुरू झाली, याची रोचक माहिती जाणून घ्या.
१५व्या शतकात ‘ब्रेकफास्ट’ हा शब्द लिखित इंग्रजी भाषेत वापरला गेला. प्राचीन युनानी लोकांनी नाश्त्याची संकल्पना सर्वप्रथम सुरू केली असल्याचे मानले जाते.
इतिहासानुसार, प्राचीन युनानी लोक सकाळी नाश्त्यासाठी दारूत भिजवलेल्या चपात्या खायचे, ही त्यावेळची सामान्य प्रथा होती.
असे म्हटले जाते की युनानी लोक दुपार आणि रात्री दोन्ही वेळा संतुलित आणि योग्य आहार घेत असत.
१७व्या शतकात नाश्त्याची प्रथा सुरू झाली होती आणि त्याकाळी नाश्ता करणे आनंदाचे प्रतीक मानले जात असे.
आनंदाचे कारण म्हणजे, सकाळी उठल्यानंतर कोणत्याही कामाच्या आधी खाणे सुखद अनुभव मानले जात होते.