2025 Raksha Bandhan SAAM TV
लाईफस्टाईल

2025 Raksha Bandhan: रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधताना तीन गाठी बांधा, भावाचे भविष्य होईल उज्वल

Rakhi Tradition : रक्षाबंधन २०२५ मध्ये राखी बांधताना तीन गाठी बांधण्यामागचं धार्मिक आणि भावनिक महत्व जाणून घ्या. या गाठी भावाच्या रक्षणासाठी आणि नात्याच्या बळासाठी बांधल्या जातात.

Sakshi Sunil Jadhav

  1. रक्षाबंधन सण यंदा ९ ऑगस्ट २०२५ रोजी शनिवारी साजरा होणार आहे.

  2. राखी बांधताना तीन गाठी बांधण्यामागे धार्मिक आणि भावनिक श्रद्धा आहे.

  3. राखीच्या तीन गाठी त्रिदेवांचे प्रतिनिधित्व करतात.

  4. रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त सकाळी ५:४७ ते दुपारी १:२४ पर्यंत असेल.

भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा प्रतीक असलेला रक्षाबंधन सण यंदा ९ ऑगस्ट २०२५ रोजी, शनिवारी साजरा केला जाणार आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला दरवर्षी हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्याची, यशाची आणि सुरक्षिततेची प्रार्थना करतात. त्याला उत्तम आयुष्य लाभो, अशी मनोकामना करतात. त्याच वेळी, भाऊ देखील आपल्या बहिणीला भेटवस्तू देऊन तिला आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतात. मात्र तुम्हाला राखी बांधताना काही नियम पाळण अत्यंत आवश्यक आहे.

राखी बांधताना अनेक वेळा बहिणी धाग्याच्या तीन गाठी बांधतात. हे अनेकांनी पाहिलं असेल, पण त्या तीन गाठींचं धार्मिक आणि भावनिक महत्त्व फार कमी लोकांना ठाऊक असतं. या गाठी केवळ एक समारंभाचा भाग नसून, त्या त्रिदेव ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानल्या जातात. पहिली गाठ ब्रह्म देवांना समर्पित असते. जे सृष्टीचे निर्माता मानले जातात. या गाठींमुळे जीवनात सकारात्मकतेची सुरुवात होते. दुसरी गाठ भगवान विष्णूंना अर्पण केली जाते, जे पालनकर्ते आहेत. त्यामुळे भावाच्या रक्षणासाठी, त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी ही गाठ बांधली जाते. तिसरी गाठ महादेवांना अर्पण असते. हे शिवशक्तीचं प्रतीक असून, वाईट शक्तींपासून रक्षण आणि जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी ही गाठ बांधली जाते.

याचबरोबर, तीन गाठी भाऊ-बहिणीच्या नात्यातील ''प्रेम, विश्वास आणि संरक्षण'' या तीन मुल्यांचंही प्रतीक मानल्या जातात. राखी बांधताना बहीण केवळ तिच्या भावाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत नाही, तर त्यांच्या नात्यातील बंध अधिक घट्ट होण्यासाठी ती गाठी प्रेमाने बांधते. म्हणूनच राखीचे धागे फक्त एक परंपरा नसून, त्या मागे बहिणीची श्रद्धा, भावना आणि नात्याचा गूढ अर्थ दडलेला असतो.

रक्षाबंधन २०२५ साठी शुभ मुहूर्त

रक्षाबंधन सकाळी ५:४७ वाजता सुरू होईल आणि दुपारी १:२४ वाजता समाप्त होईल. म्हणजेच, भावाला राखी बांधण्यासाठी तब्बल ७ तास ३७ मिनिटे उपलब्ध असतील. या शुभ वेळेत बहिणीने प्रेमाचा धागा बांधला तर त्याला आणखीच आध्यात्मिक आणि भावनिक बळ मिळेल. रक्षाबंधन हा केवळ सण नसून, नात्याच्या घट्ट बंधाचा, श्रद्धेचा आणि प्रेमाचा उत्सव आहे.

रक्षाबंधन २०२५ किती तारखेला आहे?

रक्षाबंधन यंदा ९ ऑगस्ट २०२५, शनिवारी साजरा केला जाणार आहे.

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे?

राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त ९ ऑगस्ट रोजी सकाळी ५:४७ पासून दुपारी १:२४ पर्यंत असेल.

राखी बांधताना तीन गाठी का बांधतात?

तीन गाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे प्रतीक मानल्या जातात आणि त्या भावाच्या रक्षण, समृद्धी आणि संरक्षणासाठी असतात.

तीन गाठींचं भावनिक महत्व काय आहे?

प्रेम, विश्वास आणि संरक्षण या नात्यातील तीन आधारस्तंभांचं प्रतीक म्हणून राखीच्या गाठी केवळ एक परंपरा नसून श्रद्धेचं प्रतिक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SIP Calculation: दर महिन्याला ₹६,००० गुंतवा अन् ₹५ लाख मिळवा, SIP कॅल्क्युलेशन एकदम सोप्या भाषेत

Maharashtra Live News Update : नाशिक परिसरातील गोळीबार प्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक

Fitness Tips: फिट राहायचंय? वय आणि जेंडरनुसार किती करावेत पुशअप्स?

Banjara ST Category Demand: बंजारा समाजाच्या मागणीवरून वातावरण तापलं, नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा महामोर्चा, VIDEO

EPFO News : निवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी धुमधडाक्यात! किमान पेन्शन २५०० रुपयांनी वाढण्याची शक्यता, कुणाला मिळणार फायदा?

SCROLL FOR NEXT