
घोस्टलाइटिंग हा रिलेशनशिपमधला धोकादायक ट्रेंड आहे, ज्यात अचानक संवाद तुटतो.
एखादी व्यक्ती आयुष्यात परत येऊन तुमच्यावर दोष टाकते आणि भावनिक गोंधळ वाढवते.
घोस्टलाइटिंगमुळे वागणे आणि आत्मविश्वास कमी होतो व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
संवाद, आत्ममूल्य आणि गरज असल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणं हे उपाय आहेत.
सध्या कपड्यांचे खाण्याचे विविध ट्रेंड चालू आहेत. त्यातच रिलेशनशिपच्या जगातही दररोज नवे ट्रेंड्स समोर येत आहेत. यामध्ये काही निरुपद्रवी असले तरी काही ट्रेंड्स इतके धोकादायक ठरतात की, त्यांचा थेट मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यातीलच एक अतिशय धोकादायक आणि चर्चेत असलेला ट्रेंड म्हणजे "घोस्टलाइटिंग" आहे.
तुम्ही "गॅसलाइटिंग" हा शब्द ऐकला असेलच, जिथे समोरची व्यक्ती तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत वाटायला लावते. पण घोस्टलाइटिंग हे एक पाऊल पुढे गेलेलं आहे. इथे, व्यक्ती नात्याच्या मधोमध अचानक गायब होते. ना फोन, ना मेसेज, ना कुठलाही संवाद. तुम्ही वाट बघत राहता, विचारात पडता, आणि शेवटी स्वतःलाच दोष देऊ लागता.
घोस्टलाइटिंगमध्ये जे घडतं, ते इतकं सूक्ष्म आणि गोंधळात टाकणारं असतं की, त्याचा बळी पडलेली व्यक्ती हळूहळू आत्मविश्वास गमावला लागते. एकदा गायब झाल्यावर ती व्यक्ती काही दिवसांनी परत येते, आणि तुम्हाला असे वाटवते की सगळं तुमच्यामुळेच बिघडलं. अशा प्रकारच्या वागणुकीमुळे मनात संभ्रम निर्माण होतो. नातं आहे की नाही, आपण चुकीचे आहोत का, की फक्त खूप विचार करतोय? असे प्रश्न तुम्हाला पडायला सुरुवात होते.
घोस्टलाइटिंगची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे 'भावनिक भ्रम' ही आहे. सोशल मीडियावर लाईक, स्टोरीज बघणं सुरूच असतं, पण प्रत्यक्ष संवाद संपलेला असतो. नातं ना सुरू राहिलेलं असतं, ना पूर्ण संपलेलं. आणि अशा गोंधळात, त्या व्यक्तीवर प्रेम करणारा माणूस अधिकच खोल तणावात जातो. हे बदलेलं वर्तन मनावर खोल परिणाम करतं. सततच्या विचारांनी झोपेत अडथळा येतो, आत्मविश्वास हरवतो, आणि मानसिक आरोग्य बिघडतं.
समाज माध्यमांमुळे नाती अधिक जलद जुळतात, पण त्याच वेगाने तुटण्याचं प्रमाणही वाढलं आहे. अशा काळात, घोस्टलाइटिंगसारखे ट्रेंड केवळ एक नातं मोडत नाहीत, तर व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यावर दीर्घकालीन परिणाम करतात. जर एखादी व्यक्ती सतत तुम्हाला गोंधळात टाकत असेल, संवाद टाळत असेल तर थांबा. विचार करा. कारण कधीकधी, नातं संपवण्यापेक्षा त्यात अडकून राहणं जास्त हानीकारक असतं.
घोस्टलाइटिंग म्हणजे काय?
घोस्टलाइटिंगमध्ये एखादी व्यक्ती नात्याच्या मधोमध अचानक कोणतीही सूचना न देता निघून जाते.
घोस्टलाइटिंग गॅसलाइटिंगपेक्षा वेगळं कसं आहे?
गॅसलाइटिंगमध्ये समोरची व्यक्ती तुम्हाला मानसिकरित्या चुकीचं वाटायला लावते. पण घोस्टलाइटिंगमध्ये ती आधी न सांगता दूर जाते आणि नंतर परत येऊन तुमच्यावरच दोष टाकते.
घोस्टलाइटिंगमुळे काय परिणाम होतो?
या प्रकारामुळे आत्मविश्वास कमी होतो, सतत गोंधळ वाटतो, झोपेवर परिणाम होतो आणि मानसिक आरोग्य बिघडू शकतं. आपणच चूक आहोत असा गैरसमज निर्माण होतो.
घोस्टलाइटिंग टाळण्यासाठी काय करावं?
वारंवार आयुष्यात गोंधळ निर्माण करणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा.