Sakshi Sunil Jadhav
सणासुदीच्या दिवसात गोडाचे पदार्थ हमखास बनवले जातात.
तुम्ही यंदा येत्या रक्षाबंधनाला श्रीखंड पुरीचा बेत करणार असाल तर पुढील टिप्स तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.
तुम्हाला कुरकुरीत पुऱ्या हव्या असतील तर कणिक मळताना त्यात गरम तेलाचे किंवा तूपाचे मोहन घाला.
पुऱ्या चवदार होण्यासाठी मीठ आणि कोमट पाण्याचा वापर करा.
पुऱ्या तळण्याआधी कणिक १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा.
पुऱ्या तळताना तेल व्यवस्थित गरम झालेलं असाव. तुम्ही थंड तेलात पुऱ्या तळल्यात तर तेलकट होतात.
पुऱ्या लाटताना खूप पातळ लाटू नका. मध्यम जाडी योग्य आहे.
NEXT : रोज वरण-भात कशाला? आज झटपट करा मोड आलेल्या कुळिथाची उसळ रेसिपी