Sakshi Sunil Jadhav
दररोजच्या आहारातला प्रत्येक पदार्थ पोट भरणारा असावा, पण त्याचबरोबर शरीराला पोषण देणाराही असावा. पुढे आपण मोड आलेल्या कुळिथाची उसळची रेसिपी जाणून घेऊ.
दोन कप मोड आलेले कुळीथ, कांदे, लसुण पाकळा, मिरची, तेल, टोमॅटो, जिरं, हिंग, हळद, मसाला, मीठ, कोथिंबीर इ.
सर्वप्रथम कांदा हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो बारिक चिरुन घ्या.
आता प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करुन त्यात हिंग आणि जिरं घाला.
जिरं तडतडल्यावर लसूण, कांदा, मिरची, टोमॅटो परतून मसाले घाला.
मद कुळीथ घालून परता. मीठ आणि आवश्यक पाणी घालून कुकरला झाकण लावा.
दोन शिट्ट्या दिल्यानंतर कुळथाची उसळ तयार होईल.