Ganesh Chaturthi moon sighting saam tv
लाईफस्टाईल

Ganesh Chaturthi Moon: गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्राला का पाहू नये? जाणून घ्या यामागील कारण

Ganesh Chaturthi moon sighting: गणेश चतुर्थीचा सण संपूर्ण भारतात उत्साहात साजरा होतो. या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते. पण, या सणाबद्दल एक गोष्ट अनेकदा ऐकायला मिळते ती म्हणजे गणेश चतुर्थीच्या रात्री चंद्र पाहू नये.

Surabhi Jayashree Jagdish

  • गणेश चतुर्थीला चंद्र न पाहणे शुभ मानले जाते.

  • चंद्राने गणेशाला हसताना पाहिल्याने शाप आला.

  • श्रीकृष्णांवर स्यमंतक मणीचा खोटा आरोप आला.

हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला खूप महत्वाचं स्थान आहे. यावर्षी हा उत्सव २७ ऑगस्टपासून सुरू होऊन अनंत चतुर्दशीला संपणार आहे. दहा दिवस चालणारा हा उत्सव भक्तांसाठी खूप आनंदाचा असतो. बाप्पा घरी येण्यासाठी लोक वर्षभर वाट बघतात. दरम्यान गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र बघणं वर्ज्य मानलं गेलं आहे. असं मानलं जातं की, जर एखाद्यानं या दिवशी चंद्र पाहिला, तर त्याच्यावर खोटा आरोप किंवा कलंक लागू शकतो.

गणेश चतुर्थीला चंद्र का पाहू नये?

पौराणिक कथेनुसार, एकदा गणेशजी आपल्या वाहन उंदरावर बसून फिरत होते. अचानक उंदीर काहीतरी अडथळ्याला धडकला आणि त्याचा तोल गेला. त्यामुळे गणेशजी खाली पडले. हे पाहून चंद्रदेव मोठ्याने हसू लागले. त्यावेळी गणेशजींना हे अजिबात आवडलं नाही. रागावून त्यांनी चंद्राला शाप दिला की, "आजपासून जो कुणी गणेश चतुर्थीच्या दिवशी तुला पाहील, त्याच्यावर खोटा आरोप लागेल."

भगवान श्रीकृष्णावरही लागला खोटा आरोप

असं सांगितलं जातं की, एकदा भगवान श्रीकृष्णांनीसुद्धा गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकून चंद्र पाहिला. त्यानंतर त्यांच्यावर स्यमंतक मणी चोरीचा खोटा आरोप लावण्यात आला. श्रीमद्भागवत कथेत याचा उल्लेख आहे. त्या आरोपातून मुक्त होण्यासाठी कृष्णाला खूप प्रयत्न करावे लागले.

संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन आवश्यक

गणेश चतुर्थीला चंद्र पाहणं टाळावं लागतं, पण याउलट संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शनाशिवाय व्रत पूर्ण होत नाही. त्या दिवशी चंद्राला अर्घ्य देणं आणि दर्शन करणं हे महत्वाचं मानलं जातं.

चुकून गणेश चतुर्थीला चंद्र पाहिला तर काय करावे?

जर कोणी गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकून चंद्र पाहिला, तर त्या दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी हे उपाय सांगितले जातात –

  • भगवान कृष्णाच्या नावाचा जप करावा.

  • गणपतीचं व्रत करावं.

  • "सिंह: प्रसेन मण्वधीत् सिंहो जाम्बवता हतः।

    सुकुमार मा रोदीः तव ह्येषः स्यमन्तकः।।"

    हा मंत्र म्हटला पाहिजे.

गणेश चतुर्थीला चंद्र का न पाहावा?

चंद्राने गणेशाला हसताना पाहिल्याने शाप आहे, म्हणून न पाहावा.

गणेशाचा चंद्राला कोणता शाप आहे?

जो गणेश चतुर्थीला चंद्र पाहील त्यावर खोटा आरोप येईल.

श्रीकृष्णांवर कोणता खोटा आरोप आला होता?

स्यमंतक मणी चोरीचा खोटा आरोप आला होता.

संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन का आवश्यक आहे?

संकष्टी चतुर्थीचे व्रत चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण होत नाही.

चुकून चंद्र पाहिल्यास कोणता मंत्र म्हणावा?

“सिंह: प्रसेन मण्वधीत्...” हा मंत्र म्हटला पाहिजे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या 60 कोटी फसवणूक प्रकरणात बॉलीवूड सेलिब्रिटींची होणार चौकशी; 'या' अभिनेत्रींना पाठवली नोटीस

नाशिककरांनो पाणी जपून वापरा, शनिवारी शहरात पाणी नाही, रविवारीही.. नेमकं कारण काय?

Cricket : अष्टपैलू खेळाडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, सामन्यादरम्यान झाले वडिलांचे निधन; VIDEO

Maharashtra Live News Update: वंजारी समाजाला एसटीमधून आरक्षण द्यावे यासाठी पुण्यात वंजारी समाज आक्रमक

iPhone 17 Sale: iPhone 17 ची क्रेझ! मध्यरात्रीपासूनच मुंबईच्या Apple स्टोअरबाहेर लांबच लांब रांगा, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT