Mangalwar Upay: कर्जातून मुक्तता हवी असल्यास मंगळवारी 'हे' उपाय करा; हनुमान प्रसन्न होतील
मंगळवार हनुमानजींना अर्पित दिवस आहे.
हनुमान चालीसा पठण मंगळदोष शांत करते.
लाल वस्त्र आणि गूळ दान फायदेशीर आहे.
मंगळवार हा दिवस रामभक्त हनुमानजींना अर्पण मानला जातो. या दिवशी मंगळ ग्रहाचाही प्रभाव असतो. ज्यांच्या कुंडलीत मंगळदोष असतो त्यांना आयुष्यात अडचणी, तणाव, वाद-विवाद किंवा अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. अशा वेळी मंगळवारच्या काही खास उपायांनी मंगळदोष कमी करता येतो.
ज्योतिष्य तज्ज्ञांच्या मते, या दिवशी केलेले काही खास प्रयोग कर्जमुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जातात. चला तर जाणून घेऊया मंगळवारचे महत्त्वाचे उपाय कोणते आहेत ते जाणून घेऊया.
मंगळदोष कमी करण्याचे उपाय
हनुमान चालीसा पठण
मंगळवारी संध्याकाळी हनुमानजींची नियमपूर्वक पूजा करावी. भोग म्हणून बूंदी आणि पान अर्पण करावं. त्यानंतर श्रद्धेने हनुमान चालीसा पठण करावी. लाल फुल अर्पण करून प्रार्थना केल्यास मंगळदोष शांतीस मदत होते.
मंत्रजप
मंगळवारच्या दिवशी मंदिरात हनुमानजींसमोर बसून “ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः” हा मंत्र १०८ वेळा जपावा. या दिवशी लाल वस्त्र परिधान करणं, मसूर डाळ आणि गूळ दान करणं हेही लाभदायक ठरतं. त्याचप्रमाणे या दिवशी पूर्ण दिवस आणि रात्रभर मीठाचा त्याग करावा.
कर्जमुक्तीसाठी उपाय
मंगळवारी हनुमान मंदिरात सिंदूर अर्पण केल्यास कर्जमुक्तीचा मार्ग खुला होतो असं मानलं जातं.
या दिवशी ऋणमोचक मंगलस्तोत्राचं पठण केल्याने कर्जफेडीसाठी संधी मिळते. त्याचप्रमाणे धनप्राप्तीचे मार्ग उघडतात.
११ पिंपळाच्या पानांवर चंदनाने ‘श्रीराम’ लिहून ती पानं हनुमानजींना अर्पण करावीत. या उपायामुळे कर्जातून सुटका होण्यास मदत होते.
एक नारळ डोक्यावरून सात वेळा फिरवून तो हनुमान मंदिरात ठेवावा. हा उपाय मोठ्यात मोठे कर्ज कमी करण्यास प्रभावी मानला जातो.
हनुमानजींच्या समोर बसून १०० वेळा श्रद्धेने हनुमान चालीसा म्हटल्यास कर्जाचा भार कमी होतो आणि हळूहळू पूर्णपणे उतरतो.
मंगळवारचा दिवस कोणाशी संबंधित आहे?
मंगळवार हा हनुमानजी आणि मंगळ ग्रहाशी संबंधित आहे.
मंगळदोष शांत करण्यासाठी कोणते पठण करावे?
हनुमान चालीसा नियमित पठण करावी.
मंगळवारी कोणता मंत्र १०८ वेळा जपावा?
“ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः” हा मंत्र जपावा.
कर्जमुक्तीसाठी कोणता उपाय प्रभावी मानला जातो?
नारळ डोक्यावरून सात वेळा फिरवून मंदिरात ठेवावा.
मंगळवारी कोणत्या वस्तूचा त्याग करावा?
मंगळवारी पूर्ण दिवस मीठाचा त्याग करावा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.