Red Eye in Photos SAAM TV
लाईफस्टाईल

Red Eye in Photos : रात्री फोटोमध्ये का दिसतो डोळ्यांचा रंग लाल? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Photo Effect On Eyes In Night : मोबाईल आणि कॅमेरामुळे आपल्याला सहज असंख्या क्षण टिपून ठेवता येतात. मात्र हल्ली रात्री फोटो किंवा सेल्फी काढताना फोटोंमध्ये डोळ्यांचे बुबुळ लाल दिसतात. या मागील वैज्ञानिक कारण जाणून घेऊयात.

Shreya Maskar

मोबाईलमुळे प्रत्येक क्षण कॅप्चर करून ठेवणे सहज सोपे झाले आहे. त्यामुळे फोटो आणि सेल्फी मोठ्या प्रमाणात काढल्या जातात. अनेक वेळा रात्री फोटो किंवा सेल्फी काढताना आपण पाहतो की, फोटोमध्ये आपल्या डोळ्यांच्या बुबुळांचा रंग लाल दिसतो. पण असे का होते? याचा विचार कधी कोणी केला आहे का? यामागील वैज्ञानिक कारण आज जाणून घेऊयात.

फोटोंमध्ये डोळे लाल दिसण्याचे कारण काय?

सर्वेक्षणातून असे दिसून आले का, रात्री फोटो काढताना आपण फ्लॅशलाईटचा आपण वापर करतो. यामुळे फोटोमध्ये डोळे लाल दिसू लागतात. डोळ्यांच्या बुबुळावर पडणाऱ्या प्रकाशामुळे हा परिणाम डोळ्यांवर झालेला दिसतो. तुम्ही नीट पाहिले असल्यास तुम्हाला समजेल की, डोळ्यांमध्ये दिसणारा लाल रंग हा अनेक शेड्सचा असतो. कारण डोळ्यांच्या रेटिनावर जितका जास्त प्रकाश पडतो. तितकेच डोळे जास्त लाल दिसतात. रेटिना जेव्हा डोळ्यांवर येणाऱ्या प्रकाश रिफ्लेक्ट करते. तेव्हा रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन बुबुळाचा रंग बदलतो आणि हेच रिफ्लेक्शन कॅमेऱ्यामध्ये कैद होते.

रात्री फोटो काढताना कोणती काळजी घ्यावी?

  • रात्री फोटो काढताना कॅमेऱ्यापासून थोडे दूर उभे राहावे.

  • रात्री फोटो काढत असलेल्या ठिकाणी जास्त लाईट लावल्यास फोटोंमध्ये डोळे लाल दिसण्याचं प्रमाण कमी होते.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT