आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक हार्ट अटॅकसारख्या समस्या वाढल्या आहेत. मात्र तुम्ही कधी नीट पाहिलंय का की, हार्ट अटॅक हे अधिकतर सकाळच्या वेळेस येतात. अनेक अभ्यास आणि वैद्यकीय संशोधनामधून ही गोष्ट समोर आली आहे. अनेक कार्डियोलॉजी इंस्टिट्यूटटच्या माहितीनुसार, सकाळी ६ ते १२ या वेळेत हृदयावर मोठा ताण येतो.
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, सकाळच्या वेळी हार्मोन्समध्ये बदल होतात त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढतो. या आर्टिकलच्या माध्यमातून सकाळच्या वेळेस हार्ट अटॅकचा धोका वाढतो आणि त्यामागे काय कारणं आहेत ते जाणून घेऊया.
मानवी शरीर हे Circadian Rhythm वर चालतं. ज्यामध्ये आपल्या जे झोपेचं पॅटर्न, हार्मोन्सची पातळी आणि रक्तदाब नियंत्रणात असतो. सकाळी उठल्यावर Adrenaline आणि Cortisol सारख्या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी वाढते. परिणामी हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढतो. अशावेळी हृदयावर ताण येऊन हार्ट अटॅक येतो.
सकाळ्या वेळेस रक्तदाबात आणि हृदयाच्या ठोक्यांमध्ये अचानक वाढ होते. ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉलचा त्रास असतो म्हणजेच धमन्यांमध्ये प्लाक असतो त्या व्यक्तींमध्ये रक्तदाब वाढला की प्लॅक फुटतो आणि रक्तात गाठी तयार होतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळा ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
सकाळच्या वेळेत रक्ताची Viscosity वाढू लागते. यामुळे प्लेटलेट्स सहजरित्या एकत्र येतात. त्यामुळे रक्तात गाठी तयार होण्याची शक्यता वाढते. परिणामी हार्ट अटॅक येण्याचा धोका अजून वाढतो.
सकाळच्या वेळी हार्ट अटॅक येण्याचं अजून एक मोठं कारण म्हणजे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे हृदयाला होणाऱ्या रक्तप्रवाहामध्ये अडथळा निर्णाण होतो. ज्या व्यक्तींना आधीपासून हृदयाचे गंभीर आजार आहेत त्या व्यक्तींसाठी ही परिस्थिती अधिकच गंभीर ठरते.
जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत हार्ट अटॅक येण्याचा धोका तब्बल ४० टक्क्यांनी जास्त असतो. सकाळी आलेला हार्ट अटॅक हा दिवसभरात नंतर आलेल्या अटॅकपेक्षा हृदयाच्या स्नायूंचं २०-२५ टक्क्यांनी अधिक नुकसान करतं.
सकाळी उठल्यावर लगेच हाय इंटेसिटी व्यायाम करू नये. जीमला गेल्यावर हलकं स्ट्रेचिंग करा
दररोज पुरेशी झोप घ्या. रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत जागणं टाळा.
जर तुम्हाला कधी हार्ट अटॅक येऊन गेला असेल तर डॉक्टरांनी दिलेल्या गोष्टी अवश्य पाळा
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.