Bhagavad Gita saam tv
लाईफस्टाईल

Bhagavad Gita : मनुष्य पापं करण्यासाठी का भाग पडतो? भगवद्‌गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितली कारणं

Bhagavad Gita : भगवान श्रीकृष्णांनी अनेक चांगले उपदेश दिले आहेत. याचं योग्य पद्धतीने पालन केल्यास आयुष्यात समस्या येणार नाहीत.

Surabhi Jayashree Jagdish

भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक एक ग्रंथ असून निर्णायक प्रसंगी श्री कृष्ण अर्जूनाला गीता रहस्य सांगतात. असं म्हटलं जातं की, गीतेमध्ये दिलेले ज्ञान हे प्रचंड अमूल्य आहे. सध्याच्या काळात प्रत्येकाने गीतेमध्ये दिलेल्या उपदेशांचे पालन केलं तर त्या व्यक्तीचं जीवन सुकर होऊ शकतं.

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला काही उपदेश दिले होते. असं म्हणतात एका अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारलं होतं की, एखादा व्यक्ती पाप करण्यासाठी भाग का पडतो? त्याच्यावर कोण जबरदस्ती करतो?

श्रीकृष्णाने दिलं होतं उत्तर

अर्जुनाच्या या प्रश्नाचं उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणाले होते की, मनुष्याची वासना आणि निस्वार्थ प्रेम त्याला पाप करण्यासाठी भाग पाडतात. त्याचप्रमाणे राग हा वाईट असून क्रोध आणि मोह व्यक्तीला पाप करण्यासाठी भाग पाडतो. त्यामुळे आपल्यामध्ये असलेल्या या शत्रूंना ओळखणं फार गरजेचं आहे.

अतिरागामुळे व्यक्तीमध्ये गोंधळ निर्माण होतो. एकदा का हा गोंधळ निर्माण झाला की, त्या व्यक्तीच बृद्धी विचलीत होते. परिणामी तुमच्या तर्काचा नाश होऊ लागतो आणि तुमची अधोगती होण्यास सुरुवात होते.

इच्छा ही माणसाच्या मनात आणि इंद्रियांमध्ये वास्तव्यास असते. एखादी इच्छा व्यक्तीला काहीही करण्यास भाग पाडू शकते. त्यामुळे इच्छा ही माणसाची सर्वात मोठी शत्रू असून तीच तिच्या अधोगतीचं कारण बनू शकते.

श्रीकृष्ण पुढे सांगतात की, ज्याप्रमाणे आग लागल्यानंतर धूर होतो आणि हा धूर आगीला व्यापून टाकतो, त्याचप्रमाणे मोह आणि वासना व्यक्तीला व्यापून टाकतात.

टीप : वरील सर्व माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम आम्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

SCROLL FOR NEXT