Mahavir Jayanti Saam Tv
लाईफस्टाईल

Mahavir Jayanti : महावीर जयंती का साजरी केली जाते ? जाणून घ्या महत्त्व आणि प्रेरक विचार

Happy Mahavir Jayanti : यंदा महावीर जयंती ४ एप्रिलला आहे. जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर महावीर स्वामी यांचा जन्म बिहारमधील कुंडग्राम येथे झाला.

कोमल दामुद्रे

Mahavir Jayanti 2023 : दरवर्षी महावीर जयंती चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते. यंदा महावीर जयंती ४ एप्रिलला आहे. जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर महावीर स्वामी यांचा जन्म बिहारमधील कुंडग्राम येथे झाला.

भगवान महावीरांचे बालपणीचे नाव वर्धमान होते. असे म्हटले जाते की, वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी राजवाड्यातील सुखांचा त्याग केला आणि सत्याच्या शोधात जंगलाकडे (Forest) निघाले. घनदाट जंगलात राहून त्यांनी बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली, त्यानंतर रिजुबालुका नदीच्या काठी साल वृक्षाखाली त्यांना कैवल्यज्ञान प्राप्त झाले.

भगवान महावीरांनी समाजाच्या उन्नतीसाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी उपदेश केला. अशा परिस्थितीत महावीर जयंतीचा शुभ मुहूर्त आणि त्यांचे विचार जाणून घेऊया.

1. महावीर जयंती 2023 शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 03 एप्रिल 2023 रोजी सकाळी 06.24 वाजता सुरू होईल. ही तारीख दुसऱ्या दिवशी 04 एप्रिल 2023 रोजी सकाळी 08.05 वाजता संपेल. 04 एप्रिल रोजी उदय तिथी येत असल्याने महावीर जयंती 04 एप्रिल रोजीच साजरी (Celebrate) केली जाईल.

2. महावीर जयंतीचे महत्त्व

जैन धर्मातील लोकांसाठी महावीर जयंती अत्यंत विशेष मानली जाते. महावीर जयंतीच्या दिवशी जैन धर्मीय लोक प्रभातफेरी, विधी, मिरवणूक काढतात. भगवान महावीरांनी मानवाला मोक्षप्राप्तीसाठी पाच नियम स्थापित केले, ज्यांना आपण पंचसिद्धांत म्हणून ओळखतो. ही पाच तत्त्वे म्हणजे अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, सत्य आणि अपरिग्रह.

महावीर जयंतीच्या दिवशी भगवान महावीरांची पूजा केली जाते आणि त्यांनी दिलेल्या शिकवणुकीचे स्मरण करून त्यांचे पालन करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच यावेळी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

3. महावीर स्वामींचे विचार

  • स्वतःवर विजय मिळवा. कारण लाखो शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा ही एक गोष्ट चांगली आहे.

  • प्रत्येक आत्मा स्वतः आनंदी आणि सर्वज्ञ आहे. आनंद आपल्या आत आहे, तो बाहेर शोधण्याचा प्रयत्न करू नका.

  • प्रत्येक जीवावर दया करा. द्वेष केवळ विनाशाकडे नेतो.

  • सत्याच्या प्रकाशाने प्रबुद्ध झालेला, ज्ञानी मनुष्य मृत्यूच्या वर चढतो.

  • देवाला वेगळे अस्तित्व नाही. फक्त आपले सर्व प्रयत्न योग्य दिशेने लावल्यास आपण देवता शोधू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना फोन

Shocking: धक्कादायक! पैशांवरून टोकाचा वाद; महिलेने जेवणात मिसळलं विष, नवरा अन् सासऱ्याचा मृत्यू

Harmful kitchen utensils: तुमच्या किचनमध्ये 'या' 3 गोष्टी असतील तर तातडीने बाहेर काढा; आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचं तज्ज्ञांचं मत

Gold Price Today : दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात वाढ! ग्राहकांच्या खिशाला फटका, वाचा २४ अन् २२ कॅरेट सोन्याची किंमत

The Bads Of Bollywood Review: किंग खानच्या मुलाची 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' वेब सिरीज पास की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यूव

SCROLL FOR NEXT