Internationa lWomens Day 2025 ai
लाईफस्टाईल

8 मार्च Womens Day कधी, का आणि कसा सुरू झाला? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Womens Day History: आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्चला साजरा केला जातो. हा दिवस महिलांना त्यांचे अधिकार, समानता आणि सशक्तिकरणाला चालना सोबत कोणत्याही क्षेत्रात महिलांना भेदभाव रोखण्यासाठी उद्देशून साजरा केला जातो.

Saam Tv

आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्चला साजरा केला जातो. हा दिवस महिलांना त्यांचे अधिकार, समानता आणि सशक्तिकरणाला चालना सोबत कोणत्याही क्षेत्रात महिलांना भेदभाव रोखण्यासाठी उद्देशून साजरा केला जातो. दरवर्षी हा सण सगळ्या कॉरपोरेट ऑफीस महिलांचे कार्यालय शाळा, कॉलेज अशा सगळ्या ठिकाणी अर्थात संपुर्ण भारतात मोठ्या संख्येने साजरा केला जातो. पण साजरा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा दिवस का साजरा केला जाऊ लागला याची संपुर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा स्री-पुरुष समानतेला चालना देण्यासाठी साजरा केला जातो. २०२४-२५ मध्ये लैंगिक हिंसाचाराच्या अनेक घटना वाढत चालल्या आहेत. यात पीडित महिला आणि मुलींचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची सुरुवात १९०० रोजी सुरु करण्यात आला. १९०८ मध्ये १५,००० महिलांनी न्युयॉर्क या शहरामध्ये चांगल्या कामाची परिस्थिती, चांगला पगार आणि वोट देण्याच्या अधिकाराची मागणी केली होती.

यापुर्वी महिला दिन १९ मार्च १९११ मध्ये ऑस्ट्रेलिया, डेनमार्क, जर्मनी आणि स्वित्झरलॅंडमध्ये साजरा करण्यात आला होता. मात्र ८ मार्च १९१७ रोजी रशियन महिलांच्या संपानंतर महिला दिनाची तारीख बदलून ८ मार्च करण्यात आली. तेव्हापासून ८ मार्च हा दिन आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जातो. त्यानंतर १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी ८ मार्च रोजी या दिवसाच्या उत्सवाला अधिकृत मान्यता दिली.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाची यंदाची थीम काय?

प्रत्येक वर्षी महिला दिनाला एक थीम ठेवली जाते. तर यंदाची थीम 'अ‍ॅक्सिलरेट अ‍ॅक्शन' ही नेमण्यात आली आहे. महिलांचे जीवन सुधारण्यासाठी तसेच जलद गतीने प्रगती करण्यासाठी या संकल्पनेची योजना केली आहे. हे लोकांना, सरकारला, संघटनेला आणि महिलांच्या उन्नतीसाठी समान संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आणि भेदभाव दूर करण्यासाठी सक्रीय पावले उचलण्यास प्रेरिक करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भरत गोगावले पालक मंत्री होणार यात शंका नाही - आमदार महेंद्र थोरवे

Kidney Stone Symptoms : पाठदुखी करू नका दुर्लक्षित, असू शकतो किडनी स्टोनचा धोका; डॉक्टरांनी सांगितली ४ गंभीर लक्षणं

कोरड्या त्वचेसाठी सर्वात भारी उपाय! 'दूध-हळदीचा' फेसपॅक

Tax free income: कोणकोणत्या कमाईवर सरकार टॅक्स लावत नाही?

ऑपरेशन टायगर फेल? उद्या मातोश्रीवर येतो; ओमराजे निंबाळकरांचा उद्धव ठाकरेंना निरोप?

SCROLL FOR NEXT