Benefits of Black Paper canva
लाईफस्टाईल

Benefits of Black Paper: काळीमिरीला ब्लॅक गोल्ड का म्हंटलं जातं? जाणून घ्या काय आहेत काळी मिरीचे खाण्याचे फायदे?

Mruga Vartak

आपला भारत देश अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. त्यापैकी एक म्हणजे मसाल्याचे पदार्थ. भारतातून मसाल्याच्या पदार्थांची निर्यात पोर्तुगीज काळापासून व्हायची. त्यतलीच एक काळीमिरी. त्यानी चक्क काळीमिरी आपल्यापासून चोरलीय! आजचा आपला लाडका पदार्थ आहे, भाकरीसोबत मिरचीचा ठेचा. पण आजच्याएवढं मिरचीचं स्तोम तेव्हा नव्हतं. बटाटा, आंबा, टोमॅटो सारख्या अनेक फळं आणि भाज्यांसोबत पोर्तुगीजांनी मिरची चिलीहून आपल्याकडे आणली. तोवर आपण लिखटपणासाठी काळीमिरीचा वापर करायचो. त्या मिरी नावावरूनच आपण मिरची म्हणू लागलो. या काळीमिरीचं महत्त्व त्याच्या स्वयंपाकातल्या वापरापेक्षाही जास्त आहे. तिचे फायदे काय आहेत, हे तुम्हाला मी आज सांगणारे.

पण त्यापुर्वी काळीमिरीला ब्लॅक गोल्ड कोणी आणि का म्हंटलय ते सांगते. रोमन राज्यात या पदार्थाला ब्लॅक गोल्ड म्हंटलं गेलं. अत्यंत महाग आणि कमी उपलब्ध असलेला हा पदार्थ युरोपात होता. वास्को द गामा जेव्हा आला तेव्हा आपल्याकडचे तिचे उत्पादन आणि तिचा वापर पाहून तो चक्राउन गेला. आणि त्याने आश्चर्य व्यक्त केलं.

काळी मिरी श्वासोच्छवासाच्या समस्या दूर करते. ब्राँकायटिस, दमा आणि खोकला यासारख्या प्रदीर्घ कालावधीच्या आजारांसाठी मिरी गुणकारी आहे. तिच्यामधे अँटिऑक्सिडेंट असतात असतात. त्यामूळे तणाव निवारणासाठी मदत होते. मिरचीने जिव्हेचा दाह होतो पण काळी मिरी तिक्त चवीसाठी वापरत असलो तरीही तिच्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे वेदना आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. काळी मिरीने केवळ पदार्थांना चवच नाही तर स्वाद सुद्धा प्राप्त होतो. तिच्यात औषधी गुणधर्म असल्याने विविध जीवाणू आणि बुरशीपासून ती आपलं आणि पदार्थाचं संरक्षण करते.

पचनक्रिया सुधारण्यास तसंच, वात आणि आतड्यांसंबंधी तक्रारींवर तिची मदत होते.

त्वचा आणि केसांचे आरोग्य भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्वाचे मानले जायचे. यासाठीही तिचा उपयोग व्हायचा. जळजळ कमी करण्यासाठी मिरी गुणकारी आहे. तरीही काळी मिरीचं कमी प्रमाणात सेवन करायला हवे. जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्यावर प्रतिकुल परिणाम होऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad Crime : पैशांसाठी चोरल्या दुचाकी, रिक्षा; १३ दुचाकींसह चोरटा पोलिसांच्या ताब्यात

IND-W vs PAK-W: पाकिस्तानचा डाव फसला, श्रेयंका पाटील-अरुंधतीपुढे लोटांगण, भारतापुढे माफक आव्हान

Manoj Jarange : हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, नारायण गडावर दसरा मेळावा, व्यासपीठ उभारणीचे नारळ फोडून पूजन

VIDEO : 1500 रुपयांच्या नावाने महिलांना धमकावलं जातं; वडेट्टीवारांचा घणाघात

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

SCROLL FOR NEXT