High Blood Pressure  google
लाईफस्टाईल

High Blood Pressure : वयाच्या 30-40 मध्येच वाढतोय BP? जाणून घ्या यामागची मोठी कारणं

Hypertension : उच्च रक्तदाब हा गंभीर पण बऱ्याचदा लक्षणे न दाखवणारा आजार आहे. तो ह्रदय, मेंदू आणि किडनीवर परिणाम करू शकतो. योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीमुळे तो नियंत्रणात ठेवता येतो.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या बदलच्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना कमी वयातच गंभीर समस्येला सामोरं जावं लागतं. लोक दिवसात चांगली लाइफस्टाइल फॉलो करत आहेत असं जरी बोलत असले तरी त्यांना या गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं. मुळात चांगले कपडे, फिरणे, महागडी शॉपिंग ही लाइफस्टाइल नाही. तर त्यासोबत चांगलं आणि वेळेवर जेवणे, व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, चिडचिड कमी करणे किंवा उत्तम डाएट फॉलो करणे ही चांगली लाइफस्टाइल असल्याचं तज्ज्ञ म्हणतात.

सध्या वाढत जाणारी एक गंभीर समस्या म्हणजे, तुमचा रक्तदाब (Blood Pressure) आहे. यासंदर्भात अनेक प्रश्न सर्वांच्या मनात असतात. त्यातला एक प्रश्न म्हणजे तुमचा रक्तदाब किती आहे? पण हाय ब्लड प्रेशरमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. कारण यात शरीराचं आतून नुकसान होत असतं. त्यामुळे त्याला ‘सायलेंट किलर’ असं म्हटलं जातं. बरेच वर्षे कोणतीही लक्षणं न जाणवता हा आजार हळूहळू ह्रदय, मेंदू, मुत्रपिंड आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम करतो.

रक्तदाब सतत वाढलेला असेल तर रक्तवाहिन्यांच्या आतला नाजूक थरावर ताण येतो. त्यामुळे रक्तवाहिन्या कमी लवचिक होतात आणि त्यामघ्ये फॅटचे थर जमा व्हायला लागतात. त्यानेच तुम्हाला गंभीर समस्यांना जसं की, हार्ट अटॅक, स्ट्रोक, कोरोनरी आर्टरी डिसीजसारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते. इतकंच नाही तर हाय ब्लड प्रेशरमुळे ह्रदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते.

तज्ज्ञांच्या मते, तुम्ही चांगली लाइफस्टाइल फॉलो करून तुमचा BP नियंत्रणात आणू शकता. त्यासाठी योग्य आहार, व्यायाम आणि वजन नियंक्षणात ठेवा. तर रोजच्या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये आणि चांगल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. मीठाचं प्रमाण आहारातून कमी करा. वाईट सवयींपासून लांब राहा. यात धूम्रपान, मद्यपान, ताण, आळस, जंक फूड यासर्वाचा समावेळ होतो. ही लाइफस्टाइल सर्वाच चांगली आणि हेल्दी मानली जाते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती पल्स पोलिओ मोहीम, 67 हजार बालकांचे केले जाणार लसीकरण

वटपौर्णिमेनिमित्त साडीवर खुलून दिसतील 'या' 5 लेटेस्ट नथ डिझाइन्स

Maharashtra : महाराष्ट्रातील २०० भाविक काठमांडूमध्ये अडकले; सरकारकडे मदतीची आर्त हाक

cabinet reshuffle : मोदी मंत्रिमंडळात मोठा भूकंप! नितीन गडकरींचे खाते बदलणार? काय आहे मोदींचा मेगा प्लॅन, जाणून घ्या...

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आरतीच्या थाटात 'या' 5 वस्तू असायलाच हव्यात

SCROLL FOR NEXT