Right Side Headache: Causes, Types, Symptoms and Treatment : डोकं खूप दुखतेय, काय करू कळत नाही.. हे जवळच्या व्यक्तीकडून अथवा ऑफिसमधील सहकाऱ्यांडून तुम्ही ऐकलं असेल. डोकेदुखीचा सामना जवळजवळ प्रत्येकजण कधी ना कधी करतो. जगभरातील लाखो लोकांना डोकीदुखीचा सामना करावा लागतोय. पण काही लोकांना फक्त डोक्याच्या उजव्या बाजूलाच दुखते. ही गंभीर समस्या आहे. या डोकेदुखीमुळे प्रचंड वेदना होतात. टाळू, डोळे अन् जुबडा दुखायला लागतो. कधीकधी अस्वस्थ व्हायला लागते. पण फक्त उजव्या बाजूलाच डोके का दुखत असेल? त्याचे कारण काय असू शकते? यावर उपाय काय ? एका बाजूला डोके दुखत असेल तर कायमचा उपाय काय करता येऊ शकते? याबाबतची माहिती जाणून घेऊयात...
फक्त उजव्या बाजूलाच डोकेदुखी का होते?
उजव्या बाजूला डोके दुखायला लागले की मन अस्वस्थ होतेच. असाह्य वेदना झाल्याने काय करू अन् काय नाही असे होते. कारण, डोकेदुखीसोबत टाळू, डोळे, जबडा अन् मान इथेही वेदना होतात. मेंदूमध्येच वेदना रिसेप्टर्स नसल्यामुळे मेंदूच्या ऊतींमुळे ते क्वचितच थेट उद्भवतात. आजूबाजूच्या रक्तवाहिन्या, नसा, स्नायू आणि इतर ऊतींमधून वेदना वाढतात. एका रिसर्चनुसार, उजव्या बाजूचा मायग्रेन असलेल्या लोकांना डाव्या बाजूचा मायग्रेन असलेल्यांच्या तुलनेत कमी डोकेदुखी होते.
उजव्या बाजूला डोकेदुखी होते, कोणता प्रकार?
मायग्रेन असल्यास वारंवार डोकेदुखी होऊ शकते. याचा परिणाम एकाच बाजूला होण्याची शक्यता जास्त आहे. डोकेदुखीसोबतच मळमळ, उलट्याचा त्रास होते. काही प्रकरणांमध्ये डोकेदुखी सुरू होण्यापूर्वी व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात दृष्टी कमी होऊ शकते. ट्रिगरमध्ये हार्मोनल बदल, मोठा प्रकाश, मोठा आवाज, ताण, जेवण वगळणे यांचा समावेश होतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.
क्लस्टर डोकेदुखी
डोळ्यांच्या बाजूला प्रचंड वेदना होता. या वेदना चेहरा अन् मान, खांद्यापर्यंत कधीकधी वाढतात. कधीकधी डोकेदुखीमुळे डोळ्यातून अन् नाकातून पाणी येते. ठराविक वेळेनंतर ही डोकेदुखी जाते. पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. धूम्रपान किंवा मद्यपान केल्याने या डोकेदुखीचा धोका वाढू शकतो. या
तणाव डोकेदुखी
ही सामान्य प्रत्येकाला होणारी डोकेदुखी आहे. हळूहळू वेदना व्हायला सुरूवात होते. यामध्ये मान अन् खांद्यावर घट्टपणा जाणवतो. डोक्यात ठणकायला लागते.
मासिक पाळी, गर्भधारणा, रजोनिवृत्तीदरम्यान इस्ट्रोजेनच्या पातळीत चढ-उतार होते अन् डोके दुखायला सुरूवात होते. यामुळे कपाळ ठणकायला लागते. थकवा जाणवतो अथवा अस्वस्थ वाटते अन् चिडचिड होते.
जुनाट डोकेदुखी
प्रत्येक महिन्यात १५ दिवस अथवा त्यापेक्षा जास्त काळ डोकेदुखी होत असेल तर मायग्रेन झालेला असू शकतो. तणाव अथवा इतर कारणामुळे डोकेदुखी होत असेल तरीही दोन आठवड्यांपेक्षा जास्त डोकेदुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.
उजव्या बाजूलाच का डोके दुखतेय? वाचा कारणे
फक्त उजव्या बाजूलाच डोकेदुखी होत असेल, तर त्याची अनेक कारणे असू शकतात. लाईफस्टाईल, न्यूरोलॉजिकल, वैद्यकीय कारणामुळे डोकेदुखीची समस्या होऊ शकते.
ताण आणि चिंता, थकवा किंवा झोपेचा अभाव, अवेळी जेवण, रक्तातील साखरेचे प्रमाण, जास्त कॅफिन सेवन, औषधांचा अतिवापर, अनुवांशिक पूर्वस्थिति, स्लीप एपनिया,दात किडणे, सायनस इन्फेक्शनमुळे डोळ्यांच्या मागे आणि गालाच्या हाडांवर दाबामुळे वेदना होऊ शकतात, स्ट्रोक, धमनीविकार,ट्यूमर (सौम्य किंवा घातक) ही लक्षणे असू शकतात. जर डोकेदुखी अचानक तीव्र असेल किंवा इतर लक्षणांशी संबंधित असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्याच.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.