हिवाळ्यात पचनक्रिया मंदावल्यामुळे पोटदुखी आणि अॅसिडिटी वाढते.
जेवताना थंड पाणी किंवा जास्त प्रोसेस्ड अन्न टाळावे.
कोमट पाणी, हर्बल चहा आणि शतपावली पचन सुधारते.
हिवाळ्यात अनेकांना पोटाच्या तक्रारींना सामोरे जावे लागते. कारण प्रत्येक ऋतू बदलल्याने आपल्या शरीराचे चक्र बदलते. खाण्या-पिण्याच्या सवयी बदलतात. हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळवून देणारे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. पण काहीजणांना उष्ण पदार्थांमुळे किंवा काही चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे पोटाच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. पुढे आपण यावर काही सोपे आणि फायदेशीर उपाय जाणून घेणार आहोत.
थंडी वाढली की, पचनक्रियाही मंदावत जात असते. त्यामुळे उष्ण पदार्थ या काळात खाल्ले जातात. अन्यथा रोगप्रतिकारक शक्तीपासून मूडपर्यंत सर्वांवर परिणाम होऊ शकतो. अनेक अभ्यासांनुसार थंड वातावरणामुळे पोटातील एन्झाईम्स मंदावतात. पचन प्रक्रियेचा वेग कमी होतो आणि गट-ब्रेन कनेक्शनवर ताण वाढतो. म्हणजेच, हिवाळा हा फक्त स्वेटर आणि सूपचा ऋतू नसून 'गट-केअर सीझन' आहे.
आयुर्वेदिक तज्ज्ञांच्यानी हिवाळ्यात पचनक्रिया मजबूत करण्यासाठी काही सोप्या सवयी सांगितल्या आहेत. त्यामध्ये हिवाळ्यात लोकांची सर्वात मोठी चूक म्हणजे जेवणापूर्वी किंवा जेवताना थंड पाणी पिणे. असे केल्याने पचनसंस्था लगेचच मंदावते. याऐवजी दिवसभर गरम पाणी किंवा भाजलेल्या जीर्याचे किंवा ओव्याचे गरम पाणी पिणे पचनासाठी फायदेशीर ठरते. तसेच जेवणानंतर सुमारे १०० पावले चालणे म्हणजेच शतपावली करणे अतिशय फायदेशीर ठरते.
हिवाळ्यात पारंपरिक भारतीय आहार खाल्याने खूप फायदा होतो. तज्ज्ञांच्या मते या काळात काही महिने ठेवलेले धान्य, गूळ आणि जूनं तूप पचनासाठी अतिशय चांगले मानले जाते. संशोधनातही असे दिसून आले आहे की खूप थंड पदार्थांमुळे पचनमार्गातील स्नायूंचे आकुंचन कमी होते आणि पचनप्रक्रिया बिघडते. जर सतत अॅसिडिटी होत असेल तर रात्री भिजवलेले काळे मनुके आणि बडीशेप सकाळी चावून खाणे फायदेशीर ठरते. तसेच सेलेरी, काकडी किंवा राखी दोड्याचा रसदेखील शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतो. मात्र, वात प्रकृती असणाऱ्यांनी राखी दोड्याचे सेवन खूप प्रमाणात करू नये.
आहारात गरम, हलकं आणि थोडेसं मसालेदार पदार्थांचा समावेश ठेवावा. खूप जास्त कच्चे, थंड किंवा प्रोसेस्ड खाद्यपदार्थ टाळावेत. कारण हे पदार्थ कमकुवत झालेल्या पचनावर अधिक ताण आणतात. हिवाळ्यात हलक्या स्वरूपाचा डिटॉक्सही फायदेशीर असू शकतो. एक दिवस गरम पाणी, हलक्या हर्बल चहा आणि साधे जेवण घेतल्यास शरीराचा पचनाचामार्ग रीसेट होतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.