Sakshi Sunil Jadhav
हिवाळ्यात शरीराला उब देणारे आणि आरोग्यदायी पदार्थ खाणं फार महत्त्वाचं असतं. थंडीमध्ये नेहमीची गव्हाची चपाती खाण्याऐवजी कणकेत काही पदार्थ मिसळल्यास चपाती जास्त पौष्टिक, चविष्ट आणि ऊर्जा ठेवणारी होते.
कणकेत अर्धा चमचा सुंठ घातल्यास शरीराला आतून उब मिळते. तसेच सर्दी, खोकला आणि जळजळ कमी होण्यास जास्त फायदा होतो.
मेथीचे दाणे भाजून पावडर करून घालल्यास चपाती जास्त पौष्टिक होते. पचन सुधारते आणि साखरेचे प्रमाण नियंत्रित राहतं.
ओवा पचनक्रिया सुरळीत ठेवतो आणि गॅस, पोटफुगीपासून लगेच आराम देतो. हिवाळ्यात पोटात उष्ण ठेवणारा हा सर्वोत्तम मसाला आहे.
तिळात नैसर्गिक उष्णता देणारे घटक आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतात. त्वचा कोरडी पडू नये यासाठीही फायदेशीर आहे.
या चार पदार्थांच्या मिश्रणामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. हिवाळ्यात होणाऱ्या संसर्गांपासून संरक्षण मिळते.
मसाले मिसळल्याने चपातीची चव वाढते आणि त्या मऊ, सुगंधी होतात. मुलांनाही आवडेल अशी खास चव तयार होते.
थंडीमध्ये हात-पाय गार होतात, हुडहुडी भरते यावर हे घटक नैसर्गिक उपाय म्हणून काम करतात. रोजच्या आहारात यांचा लाभ मिळतो. नैसर्गिक उर्जा मिळते.
तिळ आणि मेथी शरीराला ऊर्जा देतात. थंड वातावरणात शरीर तंदुरुस्त राहतं. घरगुती, सोपी आणि किफायतशीर पद्धत आहे.