Baby Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Baby Care Tips : उन्हाळ्यात मुलांच्या त्वचेला खाज का लागते? अशावेळी कशी घ्याल काळजी

Dry Skin Of Babies : खरेतर लहान मुलांची त्वचा ही मोठ्या माणसांच्या त्वचेपेक्षा अधिक मऊ असते. त्याच्या शरीरीत तेल ग्रंथी कमी असतात.

कोमल दामुद्रे

Summer Baby Skin Care : कडाक्याच्या उन्हाळ्यात उष्णतेमुळे शरीराला खाज लागते. ज्यामुळे त्वचा कोरडे पडण्याचा धोका अधिक असतो. खरेतर लहान मुलांची त्वचा ही मोठ्या माणसांच्या त्वचेपेक्षा अधिक मऊ असते. त्याच्या शरीरीत तेल ग्रंथी कमी असतात.

कोरड्या त्वचेमुळे (Skin) एक्जिमा, लालसरपणा, खाज सुटणे, त्वचेवर सूज येणे होऊ शकते. यामुळे उन्हाळ्यात मुलांना खूप त्रास आणि चिडचिडेपणा येतो. अशा प्रकारे, त्यांच्या त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे जेणेकरून बाळाची (Baby) त्वचा हायड्रेटेड आणि निरोगी राहू शकेल. अशावेळी बाळाची काळजी (Care) कशी घ्याल जाणून घेऊया ज्यांच्या मदतीने तुम्ही लहान मुलांची त्वचा कोरडी होण्यापासून दूर राहू शकता.

1. आंघोळ

  • बाळांना दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा आंघोळ न करण्याचा प्रयत्न करा आणि त्यांची आंघोळ करण्याची वेळ देखील कमी करा. 5-10 मिनिटांची आंघोळ त्यांच्यासाठी भरपूर असते.

  • बाळांची आंघोळ करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांच्या त्वचेवर कोणताही रासायनिक साबण किंवा बबल बाथ वापरू नका. याशिवाय त्यांना आंघोळ करण्यासाठी गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा.

  • लहान मुलांच्या नाजूक त्वचेची काळजी घेऊन त्यांना आंघोळ करण्यासाठी प्रथिने, खनिजे आणि ग्लिसरीन असलेले बॉडी वॉश वापरा.

  • नारळापासून बनवलेले क्लिन्झर वापरा, जेणेकरून त्यांच्या डोळ्यांना इजा होणार नाही. बाळाची त्वचा मऊ टॉवेलने कोरडी करा.

2. मॉइश्चरायझिंग

  • आंघोळीच्या 3 मिनिटांच्या आत, बाळाच्या त्वचेवर मॉइश्चरायझर किंवा लोशन लावा, जे त्यांच्या त्वचेला लक्षात घेऊन बनवले जाते. ज्यामुळे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.

  • लक्षात घ्या की बाळाच्या त्वचेवर वापरले जाणारे लोशन हे डॉक्टारांनी शिफारस केलेले असावे.

  • ऑरगॅनिक किंवा कोल्ड प्रेस्ड ऑलिव्ह किंवा नारळ तेल लहान मुलांच्या नाजूक त्वचेसाठी फायदेशीर आहे.

  • बदामाचे तेल, जोजोबा तेल बाळाच्या मऊ त्वचेसाठी हायड्रेशन करण्याव्यतिरिक्त अँटिऑक्सिडंट्स तसेच जीवनसत्त्वे ए, ई आणि डी समृध्द असतात.

3. या गोष्टी देखील महत्त्वाच्या

  • बाळाची त्वचा नाजूक असते म्हणून त्यांना त्यांच्या त्वचेला त्रास देणारे कपडे घालू नका.

  • केमिकल डिटर्जंट पावडरने कपडे धुण्याऐवजी सेंद्रिय घटकांपासून बनवलेले क्लिन्झर वापरा.

  • तुमच्या घरातील हवेत आर्द्रता जोडण्यासाठी ह्युमिडिफायर वापरा.

  • तुमच्या बाळाची त्वचा अधिक उष्णता किंवा हवामानात उघडी ठेवणे टाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: दोन राष्ट्रपती असलेला एकमेव देश कोणता? ९९% लोकांना माहित नसेल

Ladki Bahin Yojana: २७ हजार लाडक्या बहिणींचे ₹१५०० कायमचे बंद, लाडकीचा अर्ज का केला बाद?

Nilesh Sable : बॉलिवूड कलाकार अन् मराठी भाषा, CHYD बाबत निलेश साबळे स्पष्ट म्हणाला...

Mumbai: घरातले साखरझोपेत, वाहतूक पोलिसानं टोकाचं पाऊल उचललं; गळफास घेत आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: नाशिक गुजरात महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद

SCROLL FOR NEXT