“Feeling sleepy around your partner? Science says it’s a sign of emotional security and better health.” 
लाईफस्टाईल

Relationships Tips : जोडीदार सोबत असताना झोप येते, चांगलं की वाईट? वाचा तज्ज्ञांनी काय सांगितले

Sleeping with partner improves heart health study : जोडीदार सोबत असताना झोप येतेय? काळजी करू नका! हे तुमच्या भावनिक सुरक्षिततेचं लक्षण असून, ऑक्सिटोसिन हार्मोनमुळे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. जोडीदाराच्या सहवासामुळे तणाव कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता वाढते.

Namdeo Kumbhar

Why Do You Feel Sleepy Around Your Partner? Science Explains the Truth : जोडीदार सोबत असताना तुम्हाला झोप लागते किंवा डोळ्यावर तंद्री येतेय का? जोडीदारामुळे तुम्हाला कंटाळा येतोय? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? पण यामुळे घारबणं अथवा टेन्शन घेण्यासारखं काही नाही. जोडीदार सोबत असताना झोप अथवा तंद्री येणारे तुम्ही एकटेच नाहीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे अनेकांसोबत घडतेय. कारण यामागे सायन्स आहे. जोडीदार सोबत असताना आराम करावा वाटणं, झोप येणे अथवा तंद्री येणे हे हार्मोन्स नर्व्हस सिस्टिमचाच एक भाग आहे. (Emotional security and sleep benefits in relationships )

भावनिक सुरक्षितता Emotional security

जोडीदार सोबत असताना तंद्री येणं, हे नक्कीच इतिहासाच्या वर्गात असण्यापेक्षा वेगळं आहे. जोडीदार सोबत असताना झोप येणं, हे उदासीनतेचे लक्षण नाही. उलट ते भावनिक सुरक्षिततेचे लक्षण असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलेय. एखाद्या व्यक्तीची भावनिक स्थिती आणि झोप एकमेकांशी जोडलेली कशी आहे, याबाबत एक्सपर्ट्सने सांगितलेय.

सुरक्षितेला जोडलेल्या व्यक्तींनी झोपेची गुणवत्ता चांगली नोंदवलेली आहे. चांगल्या झोपेमुळे आरोग्यही चांगले राहते, असे केंब्रिज विद्यापीठाने (Cambridge University) केलेल्या एका अभ्यासात आढळून आले आहे.

या झोपेमागे नेमकं विज्ञान काय आहे? What’s the science behind this sleepiness?

कितीही धोकादायक वातावरण, परिस्थितीमध्ये जगण्याची प्रवृत्ती माणसांमध्ये आहे, एकप्रकारे आपल्याला निर्सर्गाने तसेच डिझाइन केलेय. पण जेव्हा आपण सुरक्षित वातावरणात असतो तेव्हा ही प्रवृत्ती सुरू नसते. ज्याच्यासोबत सुरक्षित वाटते त्या व्यक्तीसोबत असताना अनुभवलेली भावनिक सुरक्षितता नर्वस सिस्टिमला रिलॅक्स (आरामदायी) स्थितीत आणते.

लव्ह हार्मोन ‘love’ Hormone

सुरक्षित वातावरणात शारीरिक जवळीक ऑक्सिटोसिन ('द लव्ह हार्मोन') वाढवते. ऑक्सिटोसिन ऑक्सिटोसिन हे कॉर्टिसोल सारख्या तणाव संप्रेरकांना कमी करते. त्यामुळे जोडीदार सोबत असताना गाढ झोप लागल्याचे सिद्ध झालेय.

Rest, digest and sleep

विश्वासासह प्रेम पॅरासिम्पेथेटिक नर्व्हस सिस्टमला सक्रीय करते. म्हणजेच काय तर आपले शरीर 'विश्रांती घ्या आणि पचवा' या क्रियेद्वारे प्रतिसाद देते. पीएनएस आणि चांगली झोप एकमेकांशी जोडलेली आहे. जेव्हा पीएनएस सक्रिय होते तेव्हा हृदय गती कमी होते आणि रक्तदाब कमी होतो. हे शरीराला शांत झोपेसाठी तयार करते.

काही कमी असेल तर.... Lesser ‘what ifs'

आपण ज्यावेळी एकटे असतो, त्यावेळी मनात ना ना तऱ्हाचे विचार घर करतात. आपण विचारात गुंतलेलो असते. आपण तणावपूर्ण विचार करतो अन् चिंताग्रस्त होतो. एखाद्याच्या सहवास अन् आधारामुळे आपल्यातील तणाव कमी होतो. जोडीदार असेल तर आयुष्यात काही कमी असेल त्यावर चर्चा होते अन् खंबीर पाठिंबा मिळतो. त्याच्या मदतीच्या अश्वासनामुळे मन शांत होतं. ही शांत मानसिक स्थिती नैसर्गिक तंद्री आणते, त्यामुळे जोडीदार सोबत असल्यानंतर झोप येऊ शकते.

ही झोपेची भावना आरोग्याबद्दल नेमकं काय सांगते? What does this sleepy feeling speak about your health?

प्रेम आणि गाढ झोप, ही फक्त भावनिक सुरक्षतेचं लक्षण नाही. तर यामुळे आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. जोडीदार सोबत असताना तुम्ही आनंदी असता, त्यामुळे तुम्ही निरोगी होता. जोडीदार सोबत असताना तुम्हाला सुरक्षितता आणि विश्वास या दोन्ही गोष्टी जाणवतात. पण यामुळे तुमचं हृदय तंदुरूस्त राहते, शिवाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. शांतता अन् सुरक्षितता असेल तर आयुष्यात तणाव खूप कमी जाणवतो. इतकेच नाही तर यामुळे प्रतिकार शक्ती वाढते आणि शरीर रोगांशी लढण्यास सज्ज होतं. त्यामुळे जोडीदार सोबत असेल तर आयुष्यातील अनेक अडचणी कमी होता. जोडीदार सोबत असताना तंद्री येतेय, म्हणून काळजी करू नका. तर त्या मित्राचे आभार माना.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: AI द्वारे बनवला बहीण-भावाचा अश्लिल व्हिडीओ, नंतर केलं ब्लॅकमेल; तरुणाची आत्महत्या

Shocking: मी जगू शकत नाही...; बायको प्रियकरासोबत पळून गेली, वकिलाने संपवलं आयुष्य

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर; अय्यरला नेमकी दुखापत काय झाली, कधी होईल ठणठणीत?

Nashik Crime: ठाकरे सेनेच्या सावकार नेत्याचा माज उतरवला; अपहरण प्रकरणी ठोकल्या बेड्या,नंतर काढली धिंड

Mumbai Accident : मुंबईत अपघाताचा थरार; छटपूजेहून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT