लाईफस्टाईल

Snoring causes risks: माणसं झोपेत जोरजोरात का घोरतात? जाणून घ्या कारणं, धोके आणि उपचार

Snoring causes risks treatments sleep disorder: अनेक लोक झोपेत मोठ्याने घोरतात. हे फक्त त्रासदायक नसून आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते. घोरणे हे शरीर देत असलेले संकेत आहेत ज्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

Surabhi Jayashree Jagdish

घोरण्याची समस्या ही आपल्यापैकी अनेकांना त्रास देते. काहींना ही सवय वाटू लागते. मात्र या समस्येमुळे अनेकांच्या झोपेवरही परिणाम होतो. यामुळे अपुऱ्या झोपेमुळे थकवा, चिडचिड या तक्रारीही उद्भवतात. घोरणं हे स्लिप एप्नियासारख्या गंभीर समस्यांचं लक्षण असू शकतं. जर घोरण्याची कारणं आणि परिणाम समजून घेतले तर शांत झोप लागण्यास मदत होते.

घोरण्यामागील कारणं काय आहेत?

नाकातील अडथळा येणं

सर्दी, एखाद्या प्रकारची एलर्जी किंवा सायनस यामुळे नाक बंद होण्याची समस्या निर्माण होते. अशावेळी नाकातील जागा कमी पडत असल्याने हवा फिरताना आवाज होतो.

झोपेची चुकीची पद्धत

पाठीवर झोपल्यामुळे आपली जीभ आणि मऊ टाळू काहीसा मागच्या बाजूनला सरकला जातो. यामुळे श्वसनमार्ग अरुंद होतो. त्यामुळे टिश्यूंमध्ये कंपन निर्माण होतात आणि घोरण्याचा आवाज होतो.

जास्त वजन किंवा स्थूलता

ज्या व्यक्तींना जास्त वजनाचा त्रास असतो त्यांना घोरण्याची समस्या अधिक सतावते. मानेभोवती जास्त प्रमाणात चरबी साठल्यास त्याचा श्वसनमार्गावर दाब येतो आणि तो अरुंद होतो. घशातील अतिरिक्त टिश्यूमधून हवा सरकत असल्याने आवाज होतो. त्याचप्राणे स्थूलतेमुळे स्लीप अॅप्नियाचा धोकाही वाढतो.

दारूचं सेवन आणि काही औषधांचा परिणाम

मद्यपान केल्यामुळे व्यक्तीच्या घश्यातील स्नायू काही प्रमाणात रिलॅक्स होतात. ज्यामुळे घोरण्याचा धोका वाढू शकतो. दारूच्या सेवनाने व्यक्तीला गाढ झोप लागते आणि घोरण्याचा आवाजही तीव्र येतो.

झोपेची कमतरता

अपुरी झोप झाली असल्यास जेव्हा झोप लागते तेव्हा गाढ लागते. ज्यामुळे मसल्स रिलॅक्स होतात आणि घोरण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे व्यक्तीला थकवाही येतो.

घोरणं गंभीर समस्यांचं लक्षण असतं का?

अनेकदा घोरण्याच्या समस्येमध्ये तुमच्या जीवाला धोका नसतो. मात्र अतीप्रमाणातील घोरणं हे स्लिप एप्नियाचं लक्षणं असतं. ही लक्षणं दिसल्यास घोरणं गंभीर ठरू शकतं-

  • मोठ्याने आणि वारंवार घोरणं

  • रात्री गुदमरल्यासारखं किंवा श्वास अडकल्यासारखं वाटणं

  • दिवसा जास्त झोप येणं

  • सकाळी डोकेदुखी

  • लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं

सतत घोरण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या

  • उच्च रक्तदाब

  • हृदयाच्या समस्या

  • टाईप 2 डायबिटीज

  • स्ट्रोक

  • डिप्रेशन किंवा मानसिक समस्या

  • स्मरणशक्ती कमी होणं

यावर कोणते उपचार करू शकता?

  • लाईफस्टाईलमध्ये बदल केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो. यामध्ये वजन कमी करा, वेळेत झोपा किंवा झोपण्यापूर्वी मद्यपान करू नका.

  • नाकाची शस्त्रक्रिया किंवा टॉन्सिल काढणं यासारखे उपाय गंभीर घोरण्यासाठी केले जाऊ शकतात.

  • CPAP (Continuous Positive Airway Pressure) आणि Mandibular Advancement Devices या काही वैद्यकीय डिव्हाईसमुळे त्रास कमी होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा

Ambarnath: अंबरनाथमध्ये काँग्रेसला भगदाड, काँग्रेसच्या त्या १२ नगरसेवकांचा मोठा निर्णय

मुस्लीम चिडला, जलीलांवर हल्ला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमका राडा कशामुळे झाला?

Why crocodiles cry: शिकार खात असताना मगर का रडते? उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल चकित

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

SCROLL FOR NEXT