Morning Flu Syndrome: सकाळी झोपेतून उठल्यानंतर शिंका आणि खोकला येतोय? कोणत्या आजारानं घेरलंय हे जाणून घ्या

Sneezing and coughing after waking up: अनेक लोकांना रोज सकाळी अंथरुणातून उठल्या उठल्या लागोपाठ शिंका येतात किंवा कफयुक्त खोकला सुरू होतो. अनेकदा आपण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो, 'थंडीमुळे असेल' असे म्हणून सोडून देतो.
Sneezing and coughing after waking up
Sneezing and coughing after waking upsaam tv
Published On
Summary
  • सकाळी खोकला-शिंका हे ‘मॉर्निंग फ्लू सिंड्रोम’ आहे

  • थंडी, धूळ किंवा ऍलर्जी ही कारणे असतात

  • लक्षणे सकाळी जास्त, दिवसभर कमी होतात

अनेक लोकांना सकाळी उठताच अचानक खोकला, शिंका येणं आणि नाक वाहणं यांसारख्या समस्यांता सामना करावा लागतो. काही काळाने ही लक्षण आपोआप कमी होतात पण प्रत्येक दिवसाची सुरुवात या त्रासांसोबतच होते. या स्थितीला सर्वसाधारणपणे ‘मॉर्निंग फ्लू सिंड्रोम’ असं म्हटले जातं.

या सिंड्रोमध्ये सकाळच्या वेळी फ्लूसारखी लक्षणं दिसून येतात. सकाळची थंडी नाक आणि घशावर परिणाम करतं त्यामुळे शिंक व खोकला सुरु होतो. या त्रासातून मुक्त होण्यासाठी त्यामागील नेमकी कारण ओळखणं अत्यंत गरजेचं आहे.

मॉर्निंग फ्लू सिंड्रोमची सामान्य लक्षणं काय आहेत?

या स्थितीत फक्त खोकला आणि शिंका येणं एवढेच नव्हे तर आणखी काही लक्षणंही दिसून येतात. अनेकांना सकाळी उठताच घशात खवखव, हलक्या प्रमाणातील डोकेदुखी किंवा डोक्यात जडपणा जाणवतो. नाक बंद होणं किंवा पाण्यासारखं वाहणं हे सुद्धा एक ठळक लक्षण आहे. ही लक्षणं विशेषतः ऍलर्जी किंवा सायनसच्या समस्येशी संबंधित असतात.

Sneezing and coughing after waking up
Heart Attack Reason: तरुणांमध्ये का वाढतंय हार्ट अटॅकचं प्रमाण? ICMR च्या अभ्यासातून चक्रावून टाकणारी माहिती

काही प्रकरणांमध्ये डोळ्यांत जळजळ, पाणी येणं किंवा खाज सुटण्याची समस्या दिसून येते. रात्रभर झोपल्यानंतर सकाळी अचानक थंड हवा किंवा धुळीचा संपर्क आल्यावर शरीरातील प्रतिकारशक्ती प्रतिक्रिया देतं. त्यामुळे थकवा किंवा सुस्ती जाणवू शकते. ही लक्षणं साधारणपणे सकाळच्या पहाटेच्या वेळेत अधिक असतात आणि दिवस जसजसा पुढे जातो तसतशी कमी होतात.

सकाळचा खोकला-शिंका ही आजाराची लक्षणं आहेत?

आरएमएल रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे तज्ज्ञ डॉ. सुभाष गिरी सांगतात की, ही स्थिती स्वतःमध्ये कोणताही आजार नसून एखाद्या दडलेल्या कारणाचा संकेत असू शकतो. सकाळच्या वेळी हवामानात आर्द्रतेत, थंडीत आणि प्रदूषणाच्या पातळीत बदल होतो. ज्यामुळे नाक आणि घशाच्या संवेदनशील आवरणावर त्वरित परिणाम होतो. अनेक वेळा हे वातावरणामुळे झालेली ऍलर्जी, धूळ किंवा परागकण (पॉलन) यांच्यामुळे शरीराची होणारी नैसर्गिक प्रतिक्रिया असते. काही लोकांना सायनसचा त्रास असल्यास तो सकाळी खोकला किंवा शिंकांच्या स्वरूपात बाहेर पडतो.

Sneezing and coughing after waking up
Heart Attack Reason: तरुणांमध्ये का वाढतंय हार्ट अटॅकचं प्रमाण? ICMR च्या अभ्यासातून चक्रावून टाकणारी माहिती

जर ही लक्षणं अधूनमधून होत असतील आणि थोड्या वेळात कमी होत असतील, तर काळजीची गरज नसते. पण जर दररोज सकाळी हेच लक्षणं जाणवत असतील आणि ती दिवसभर टिकून राहत असतील, तर ते ऍलर्जिक राइनायटिस, सायनुसायटिस किंवा एखाद्या सुरुवातीच्या संसर्गाचं लक्षण असू शकतं. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करणं आवश्यक आहे. जेणेकरून मूळ कारण ओळखून योग्य उपचार करता येतील.

Sneezing and coughing after waking up
Causes of cardiac arrest: हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमधील नेमका फरक काय? तज्ज्ञांनी स्पष्ट केली कारणं

मॉर्निंग फ्लू सिंड्रोमपासून बचावाचे उपाय

  • या स्थितीपासून बचाव करण्यासाठी काही सोप्या सवयी उपयुक्त ठरू शकणार आहेत.

  • खोली आणि पलंगाची नियमितपणे स्वच्छता करा, जेणेकरून धूळ किंवा ऍलर्जी निर्माण करणारे घटक साचणार नाहीत.

  • रात्री खोलीचं तापमान खूप थंड किंवा खूप गरम ठेऊ नका.

  • सकाळी उठताच खिडक्या अचानक उघडू नका, हळूहळू ताजी हवा आत येऊ द्या.

  • ऍलर्जीची समस्या असल्यास एअर प्युरिफायरचा वापर किंवा मास्क घालणं फायदेशीर ठरतं.

  • नियमितपणे पाणी प्या आणि कोमट पाण्याने गुळण्या करा, त्यामुळे घसा स्वच्छ राहतो.

Sneezing and coughing after waking up
Sudden cardiac death: अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू का होतो? कधीच समजून येत नाहीत पण संकेत देणारी कारणं
Q

मॉर्निंग फ्लू सिंड्रोम म्हणजे काय?

A

सकाळी खोकला, शिंका आणि नाक वाहणे होणे.

Q

याची मुख्य कारणे कोणती?

A

थंडी, धूळ, पॉलन किंवा ऍलर्जी ही कारणे आहेत.

Q

ही लक्षणे कधी कमी होतात?

A

दिवस पुढे जातो तसतशी लक्षणे कमी होतात.

Q

बचावासाठी काय उपाय करावेत?

A

खोली स्वच्छ ठेवा आणि तापमान नियंत्रित ठेवा.

Q

कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?

A

दररोज त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com