
हार्ट अटॅक आणि कार्डिअॅक अरेस्ट हे दोन वेगवेगळे प्रकार असून, त्यामधील फरक समजून घेणं गरजेचं आहे.
हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत अडथळा येऊन स्नायूंना ऑक्सिजन न मिळाल्याने होणारा त्रास.
हार्ट अटॅकचे मुख्य कारणं म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणं, मधुमेह, तणाव, तंबाखू, उच्च रक्तदाब व व्यायामाचा अभाव.
सध्या तरुणांना हार्ट अटॅक आणि कार्डिअॅक अरेस्ट येण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकांना वाटतं की, या दोन्ही एकच गोष्ट आहे. मात्र खरं पाहिलं तर हार्ट अटॅक आणि कार्डिअॅक अरेस्ट हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. अनेकदा या गैरसमजामुळे योग्य वेळी उपचार मिळत नाहीत आणि रूग्णाचा जीव देखील धोक्यात येतो
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत BLK मॅक्स सुपर स्पेशालिटीचे इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजी विभागाचे चेअरमन डॉ. सुबाश चंद्रा म्हणाले की, “हार्ट अटॅक म्हणजे छातीत तीव्र वेदना, घाम येणं, मळमळ, अस्वस्थ वाटणं, गुदमरल्यासारखं वाटणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या coronary artery मध्ये अडथळा आल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे हार्ट अटॅक होतो.”
डॉ. चंद्रा यांनी सांगितलं की, “ज्यावेळी हृदयाला पुरेसं रक्त मिळत नाही, तेव्हा छातीत वेदना होतात. शिवाय या परिस्थितीमध्ये हृदयाच्या स्नायूंचं नुकसान होतं. मुळात ही परिस्थिती उद्भवण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहे.
अनुवंशिकता
शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल
व्यायामाचा अभाव
सततचा मानसिक ताण
मधुमेह
उच्च रक्तदाब
तंबाखू किंवा सिगारेटचा वापर.
डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, हो हार्ट अटॅक आल्यानंतर व्यक्तीला कार्डिअॅक अरेस्ट येऊ शकतो. कधी कधी हृदयाच्या ठोक्यांचा ताळमेळ बिघडतो त्यामुळे हृदय एकदम थांबतं आणि व्यक्ती बेशुद्ध होऊन काही सेकंदांत मृत्यूही होतो. यालाच कार्डिअॅक अरेस्ट म्हणतात.
डॉ. चंद्रा यांनी सांगितलं की, कार्डियाक अरेस्ट आलेल्या व्यक्तीचा जीव वाचवता येऊ शकतो. पण त्यासाठी वेळेवर मदत मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. CPR किंवा डिफिब्रिलेटरच्या साहाय्याने झटका देऊन रुग्णाला वाचवता येऊ शकतं. जर हार्ट अटॅक असलेली व्यक्ती तात्काळ रुग्णालयात पोहोचली तर वेळ वाया न घालवता अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी करून रक्तपुरवठा पुन्हा सुरू केला जातो. ज्यामुळे तिचा जीव वाचू शकतो.
ताजं, घरचं आणि आरोग्यदायी अन्न खावं
नियमित व्यायाम करणं
मधुमेह आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणं
तंबाखू किंवा सिगारेट टाळा
ताण-तणाव कमी ठेवण्यासाठी ध्यान, योगा किंवा मन शांत ठेवणं
हार्ट अटॅक आणि कार्डिअॅक अरेस्ट यामध्ये काय फरक आहे?
हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा थांबणं, तर कार्डिअॅक अरेस्ट म्हणजे हृदयाचे ठोके थांबणे.
हार्ट अटॅक का येतो?
कोलेस्ट्रॉल वाढणं, तणाव, मधुमेह, उच्च रक्तदाब, व्यायामाचा अभाव व तंबाखू यामुळे हार्ट अटॅक होतो.
कार्डिअॅक अरेस्ट आल्यानंतर रुग्णाला वाचवता येतं का?
वेळेवर CPR किंवा डिफिब्रिलेटरने मदत केल्यास रुग्णाचे प्राण वाचू शकतात.
हार्ट अटॅकनंतर कार्डिअॅक अरेस्ट होण्याची शक्यता असते का?
हृदयाचे ठोके बिघडल्याने हार्ट अटॅकनंतर कार्डिअॅक अरेस्ट होऊ शकतो.
हार्ट अटॅक आणि कार्डिअॅक अरेस्ट टाळण्यासाठी काय करावं?
आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम, तणाव नियंत्रण, तंबाखू टाळणं आणि मधुमेह-रक्तदाब नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.