Baby Health Care Tips google
लाईफस्टाईल

New Born Baby Care: बाळाला काळा धागा बांधताय? वेळीच व्हा सावध! नाहीतर...

Baby Health: बाळाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून त्याच्या हातात, पायात, मानेत काळा दोरा बांधतात. पण याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर कसा होतो? हे पुढील माहिती द्वारे समजून घ्या.

Saam Tv

घरात बाळ जन्माला आलं की सगळ्यांनाच खूप आनंद वाटतो. सध्याच्या चालू ट्रेंडमध्ये बाळ पहिल्यांदा घरी येतं तेव्हा त्याचं जंगी स्वागत केलं जातं. अनेक लोक बाळाला भेटण्यासाठी फार उत्साही असतात. नाते वाईक, काका-काकी, मामा-मामी, शेजारी-पाजारी, मित्र-मंडळी अशी सगळी मंडळी बाळाला पाहायला येतात. त्यावेळेस घरातली मोठी व्यक्ती बाळाला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून त्याच्या हातात, पायात, मानेत काळा दोरा बांधतात. अर्थात ही पालकांना वाटणारी भावना योग्यच आहे. मात्र याचा गंभीर परिणाम तुमच्या बाळाच्या आरोग्यावर सुद्धा होऊ शकतो.

बाळाच्या गळ्यात काळे दोरे किंवा इतर कोणतेही दोरे बांधल्याने त्याचे आरोग्य बिघडते. कारण त्यागोष्टींवर अनेक बॅक्टेरिया असतात. बाळांच्या अंगाला लावलेलं तेलही त्यात मुरतं. त्याने बाळाला इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. अशी माहिती एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आम्हाला सापडली आहे. त्यामध्ये डॉ. अमोल अन्नदाते यांनी फेसबूक रीलमध्ये काळ्या धाग्यामुळे बाळाला किती समस्यांना सामोरं जावं लागतं. हे प्रत्यक्ष दाखवले आहे. त्यामध्ये डॉ. अमोल अन्नदाते यांनी सविस्तर हकीकत सांगितली आहे.

डॉ. अमोल अन्नदाते म्हणाले की, '' माझ्याकडे एका १० ते १२ वर्षाच्या ताप आल्यामुळे आणण्यात आलं होतं. त्यावेळेस माझं लक्ष त्या बाळाच्या हाता-पायांमध्ये असणाऱ्या काळ्या धाग्यांकडे गेलं. तेव्हा मी बाळाच्या पालकांना एक सल्ला दिला की, बाळ जन्माला आल्यानंतर किमान ६ ते ७ महिने त्याला कोणतेच धागे दोरे बांधू नका. आपल्या रुढी परंपरेला बाजूला ठेवा. त्याने तुमच्या बाळाचं नुकसान होऊ शकतं. तसचं काजळ बाळाला सहन होत असल्यासचं लावा. अन्यथा बाळाला इंफेक्शन होण्याचा धोका असतो. काळ्या धाग्यामुळे बाळाला अशाच अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.''

जन्माला आलेलं बाळ फार नाजूकपणे हाताळचं असतं. त्याला स्वच्छ हात असल्यासच हात लावा. स्वच्छ कपड्यांचा वापर करा. बाळाचे कपडे कडक उन्हात सुकवा. तर बाळाच्या आईने योग्य आणि पोषक आहार खा. धागे दोरे शक्यतो बांधण टाळा. कारण दृष्ट लागण्यापेक्षा बाळाची तब्बेत चांगली असणं महत्वाचं आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला, टोमॅटोने भरलेला पिकअप उलटला

Mumbai Bomb Threat: मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

SCROLL FOR NEXT