Heart attack symptoms saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack Symptom: हार्ट अटॅकची लक्षणे जावणवतायेत? हा १ पदार्थ चघळा वाचेल तुमचे आयुष्य, तज्ज्ञांनी दिला सल्ला

Aspirin Health : हृदयरोगतज्ज्ञ तज्ज्ञ यांच्या मते, हृदयविकाराचा झटका येत असल्यास ३२५ मिलीग्रॅम ॲस्पिरिनची गोळी चघळून खाल्ल्यास जीव वाचण्याची शक्यता वाढते.

Sakshi Sunil Jadhav

कार्डिओव्हॅस्क्युलर तज्ज्ञांच्या मते, जो हार्ट अटॅकच्या वेळी जीव वाचवण्यासाठी तुम्ही काही उपाय करु शकता. ९ सप्टेंबर रोजी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले की, जर कोणाला असे वाटत असेल की त्यांना हार्ट अटॅक येत आहे, तर त्यांनी लगेच ३२५ मिलीग्रॅम ॲस्पिरिनची गोळी गिळण्याऐवजी चावून खावी.

डॉ. लंडन यांच्या मते, गोळी चावून खाल्ल्यास ती रक्तप्रवाहात लवकर मिसळते आणि त्यामुळे रक्ताच्या गाठी होत नाहीत. हार्ट अटॅकमध्ये रक्तप्रवाह अडवणारी गाठ तयार होते आणि त्यामुळे हार्टपर्यंत रक्त पोहोचत नाही. अशावेळी ॲस्पिरिन घेतल्याने नवीन गाठी तयार होण्याची शक्यता कमी होते आणि झटका गंभीर होण्यापासून वाचतो.

त्यांनी सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीला ॲस्पिरिनची अ‍ॅलर्जी असेल, रक्तस्त्रावाची समस्या असेल किंवा डॉक्टरांनी ॲस्पिरिन घेऊ नका असे सांगितले असेल, तर हे पाऊल उचलू नये. पण इतर लोकांसाठी ही गोळी झटक्याच्या १ ते ४ तासांच्या आत घेतल्यास तिचा जास्त फायदा होतो. डॉ. लंडन यांच्या मते, अशा प्रकारे ॲस्पिरिन घेतल्यास हृदयाच्या स्नायूंचे नुकसान कमी होते. तसेच मृत्युचा दर कमी होतो.

वेळ असेल तर तुम्ही तुमचा जीव वाचवू शकता. त्यामुळे काही सेकंदांत घेतलेला योग्य निर्णय म्हणजेच आयुष्य वाचवू शकतो. एक साधी गोळी घेवून ती योग्य वेळी चावून खाल्ली तर ती अक्षरशः जीव वाचवू शकते. तसेच मृत्युचा धोका टाळता येतो.

टीप

ही माहिती सामाजिक माध्यमांवर शेअर केलेल्या व्हिडिओवर आधारित असून ती केवळ माहितीपुरती आहे. याचा वैद्यकीय सल्ला म्हणून वापर करू नये. कोणतीही औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.

हृदयविकाराचा झटका येत असल्याची शंका वाटत असेल, तर पहिले काय करावे?

तुम्ही वेळी त्वरित ३२५ मिलीग्रॅम ॲस्पिरिनची गोळी गिळण्याऐवजी चघळून खावी.

गोळी चघळून खाल्ल्याने नेमका फायदा काय होतो?

गोळी चघळल्यास ती लवकर रक्तप्रवाहात मिसळते, ज्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होण्याची प्रक्रिया कमी होते.

ॲस्पिरिन कोणासाठी सुरक्षित नाही?

ज्यांना ॲस्पिरिनची अ‍ॅलर्जी आहे, रक्तस्त्रावाची समस्या आहे किंवा डॉक्टरांनी ॲस्पिरिन घेऊ नका असे सांगितले आहे, त्यांनी ही गोळी घेऊ नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malavya Rajyog: 2 नोव्हेंबरपासून मालव्य राजयोग 'या' राशींना करणार मालामाल; चारही दिशांनी घरात येणार पैसा

Tirgrahi Yog: 100 वर्षांनी मंगळाच्या राशीमध्ये बनणार पावरफुल त्रिग्रही योग; 'या' 3 राशींवर बरसणार छप्परफाड पैसा

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

SCROLL FOR NEXT