Bornahan Importance in Marathi Saam Tv
लाईफस्टाईल

Bornahan Importance: ..म्हणून संक्रातीच्या काळात लहान मुलांचे केले जाते बोरन्हाण, जाणून घ्या कारण

Bornahan Importance in Marathi: नववर्षातील पहिला आणि पौष महिन्यातील मुख्य सण मकर संक्राती. येत्या १४ जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाईल. या काळात तिळगूळ वाटू एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. तसेच पतंग उडवणे आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो.

कोमल दामुद्रे

Bornahan Significance:

नववर्षातील पहिला आणि पौष महिन्यातील मुख्य सण मकर संक्राती. येत्या १४ जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाईल. या काळात तिळगूळ वाटू एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. तसेच पतंग उडवणे आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो.

संक्रांतीच्या (Makar Sankranti) दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण घातले जाते. १ ते ३ वर्षाच्या आतील मुलांच बोरन्हाण केले जाते. पण बोरन्हाण म्हणजे काय? ते का घातले जाते? हे अनेकांना माहित नाही. जाणून घेऊया यामागचे कारण.

1. बोरन्हाण का घालतात?

मूल जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिला संक्रांतीला लहान मुलांना बोरन्हाण घातलं जातं. शिशूसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. लहान मुलांच्या (kids) उत्तम आरोग्यासाठी (Health) बोरन्हाण घालण्याची ही परंपरा आहे असे म्हटले जाते.

लहान मुलांना या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे अर्थात बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरुन टाकल्या जातात. तसेच ही फळे त्यांना खाऊ घातली जातात.

2. कधी करावे बोरन्हाण?

मकर संक्रांतीपासून ते साधरणत: रथसप्तमीपर्यंतच्या दिवशीपर्यंत मधल्या काळात कधीही करु शकतो. बोरन्हाणासाठी कोणत्याही शुभ मुहूर्ताची गरज भासत नाही. या दिवशी मुलांना काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. तसेच हलव्याचे दागिने घातले जातात. बाळाला पाटावर बसवून त्याच्या बाजूला रांगोळी काढली जाते. या वेळी अनेक खेळ खेळून मुलांच्या बोरन्हाण्याचा कार्यक्रम पार पडला जातो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT