Makar Sankranti 2024 : १४ की, १५ जानेवारी मकर संक्रांती कधी साजरी केली जाईल? यादिवशी करा या वस्तू दान

Makar Sankranti 2024 Importance : हा सण जानेवारी महिन्यात हिंदू पंचागानुसार पौष या दहाव्या मराठी महिन्यात साजरा केला जातो. हा शेती संबंधित सण असून सौर कालगणनेशी याचा संबंध येतो.
Makar Sankranti 2024
Makar Sankranti 2024Saam Tv
Published On

Makar Sankranti 2024 Date :

नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती. हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजारा केला जातो. महिलांमध्ये या सणाचा अधिक उत्साह असतो.

हिंदू पंचागानुसार मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण १५ जानेवारीला साजरा केला जाईल. या दिवशी सूर्य धनु राशीतून पहाटे ०२.४५ मिनिटांनी मकर राशीत संक्रमण करेल. हा सण जानेवारी महिन्यात हिंदू पंचागानुसार पौष या दहाव्या मराठी महिन्यात साजरा केला जातो. हा शेती संबंधित सण (Festival) असून सौर कालगणनेशी याचा संबंध येतो.

या दिवशी सूर्याला विधीपूर्वक अर्घ्य दिल्याने मनुष्याला संकटांपासून मुक्ती मिळते. या दिवशी दानला अधिक महत्त्व असते. ज्यामुळे शुभ फले मिळतील. जाणून घ्या या दिवशी कोणत्या पाच गोष्टी दान करायला हव्या.

Makar Sankranti 2024
Budh Gochar 2024 : बुध ग्रहाचे धनु राशीत संक्रमण! कामात येतील अडचणी, प्रेमसंबंधात दूरावा

ज्योतिषशास्त्रानुसार दानाचे महत्त्व सांगितले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी उबदार वस्त्राचे दान केल्याने शुभ फळ मिळेल. थंडीच्या या महिन्यात दान म्हणून उबदार कपडे द्यावे.

या दिवशी तीळ दान करणे शुभ मानले जाते. तीळ दान केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद मिळू शकते असे म्हटले जाते. सूर्याच्या बलामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो.

मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे दान करा. या दिवशी तुपाचे दान केल्याने माणसाला सर्व रोगांपासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते. तसेच कुंडलीत सूर्य-गुरुची स्थिती मजबूत होते.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. या दिवशी तिळापासून बनवलेले लाडू आणि गूळसोबत तांदूळ (rice) दान करणे शुभ मानले जाते. असे दान करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात प्रगती आणि मानसन्मान मिळतो.

Makar Sankranti 2024
New Year 2024 Rashifal : नवीन वर्षात ३ राशींचे उजळेल भाग्य, वर्षभर पडेल पैशांचा पाऊस; आरोग्याची काळजी घ्या

ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी उडीद डाळीची खिचडी दान केल्याने शुभ फले प्राप्त होतील. यामुळे सूर्य, चंद्र आणि गुरुची स्थिती मजबूत होते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com