बाजरीच्या पिठात ग्लूटेन नसल्याने भाकरी तुटते.
गरम पाणी आणि तूप वापरल्यास पीठ मऊ राहते.
भाकरी हाताने थापून करावी, लाटण्याने नाही.
सर्दीच्या दिवसांत स्वयंपाकघरात सर्वाधिक चर्चेत असणारा पदार्थ म्हणजे बाजरीची भाकरी. ही बाजरीची भाकरी चविष्ट तर असतेच, पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. बाजरीच्या भाकरीमध्ये आयर्न, फायबर, प्रोटीन आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ही भाकरी शरीराला उष्णता देते आणि थंड हवेत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. म्हणूनच उत्तर भारतात हिवाळ्यात बाजरीची भाकरी, गूळ आणि पांढरे लोणी हा पारंपरिक मेनू समजला जातो.
बऱ्याच जणांना भाकऱ्या बनवताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामध्ये बाजरीची भाकरी फाटते, तुटते किंवा ती कडक होते. यामागचे कारण म्हणजे बाजरीच्या पिठात ग्लूटेन नसणे. ग्लूटेनमुळे गव्हाच्या पिठाची चपाती लवचिक आणि मऊ होते. म्हणून बाजरीची भाकरी लाटताना किंवा थापताना तुटते. तुम्ही काही सोपे उपाय वापरले तर तुम्हाला मऊ, गोल आणि न फाटणारी बाजरीची भाकरी बनवता येऊ शकते.
सर्वप्रथम, बाजरीचं पीठ मळताना गरम पाणी वापरा. थंड पाणी वापरल्याने पीठ कोरडं होतं आणि भाकरी फाटते. पाणी उकळून थोडं कोमट झाल्यावर हळूहळू पिठात मिसळा आणि हाताने नीट मळा. त्यामुळे पीठ मऊ आणि लवचिक होतं. दुसरं, पिठात थोडं देशी तूप किंवा तेल मिसळा. यामुळे पिठात ओलावा राहतो आणि भाकरी सुकत नाही. दोन कप पिठासाठी एक चमचा तूप किंवा पुरेसं आहे.
पीठ मळल्यानंतर १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा. त्यामुळे त्यात ओलावा चांगला पसरतो आणि रोटी बेलताना तडे लागत नाहीत. भाकरी लाटताना लाटण्याऐवजी हाताने थापून तयार करा. कारण लाटण्याने दाबल्यास भाकरी तुटण्याची शक्यता जास्त असते. दोन प्लास्टिक शीट किंवा केळीच्या पानांमध्ये ठेवूनही ती सहज गोल करता येते. तवा मध्यम आचेवर आधीच तापवून ठेवा. थंड तव्यावर भाकरी चिटकते आणि गरम तव्यावर जळते. भाकरी ठेवण्याआधी तव्यावर थोडंसं पाणी शिंपडा जर पाणी लगेच सुकलं तर तवा योग्य तापमानात आहे.
भाकरी शेकताना ती वारंवार उलटवू नका. आधी एक बाजू हलकी शेकून घ्या, मग पलटवा आणि दुसरी बाजू नीट शेकून शेवटी फास्ट आचेवर फुलवा. त्यामुळे भाकरी मऊ आणि स्वादिष्ट बनते. एक गोष्ट लक्षात ठेवा बाजरीचं पीठ ताजं असावं. उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवू नका, कारण ते कोरडं होतं आणि पुढच्या दिवशी भाकरी सुकते. जर पीठ उरलंच, तर ओल्या कपड्यात गुंडाळून काही तासांत वापरून टाका.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.